मुंबई : बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान सध्या मात्र एका वेगळ्याच पेचात अडकला आहे. पेच म्हणण्यापेक्षा त्याच्यापुढे असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. कारण ठरतेय ते म्हणजे मुलगा आर्यन खान याला झालेली अटक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या 14 दिवसांपासून शाहरुखचा मुलगा आर्यन खान कोठडीत आहे. तो कारागृहात असतानाच तिथं न्यायालयानं मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे अखेर खुद्द शाहरुखनेच कारागृहातजात मुलाची भेट घेतली. याआधी गौरी आणि शाहरुखनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्यनशी संवाद साधला होता. कोरोनाकाळात महाराष्ट्रात लागू असणाऱ्या नियमांप्रमाणे कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटू शकत नाहीत. पण,21 ऑक्टोबरला नियमांमध्ये बदल झाले. 


आर्यनसोबतची भेट कशी ठरली? 
कारागृहातील सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुख कलाकार असला तरीही त्यालाही कारागृह प्रशासनाच्या नियमांचं पालन करावं लागलं. भेट झाली त्यावेळी आर्यन आणि शाहरुखमध्येएक काच होती. इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला.त्यावेळी तिथं दोन गार्ड हदर होते. 


आर्यन वडिलांना पाहून फारच भावूक झाला होता, तर मुलाला या अवस्थेत पाहून शाहरुखचं मनही हळहळलं. आपल्याला कारागृहातील जेवण आवडत नसल्याचं आर्यननं सांगताच शाहरुखला त्याची आणखी चिंता वाटली. याला घरचं जेवण देता येईल का, असं त्यानं विचारताच यासाठी त्याला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असं शाहरुखला सांगण्यात आलं.