मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेली कित्येक वर्ष बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. रोमॅन्सचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुखच्या फॅन फॉलोइंगबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, तुम्हाला माहितीये का या प्रसिद्धीसाठी आणि या लोकप्रियतेचाठी एका व्यक्तीला शाहरुख आजही थँक्यू म्हणतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो, करोडोंच्या संख्येनं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारा आणि त्यांच्या मनोरंजनाची मन्नत पूर्ण करणारा हा किंग खान नेमका कोणाला इतकं महत्त्वं देतो? तुम्हालाही पडला ना प्रश्न? 


2016 मध्ये 'यारों की बारात' या कार्यक्रमादरम्यान, शाहरुखनं आपल्या कारकिर्दीतील यशाचं श्रेय अभिनेता अरमान कोहली याला दिलं होतं. 'मी इतका मोठा स्टार असण्याला अरमान कोहली जबाबदार आहे. त्यावेळी मी (दिवंगत) दिव्या भारतीसह पोस्टरवर झळकलो होतो. आजही माझ्याकडे तो पोस्टर आहे. मला एक मोठा कलाकार बनवण्यासाठी Thank You.'


अडचणीत अरमान... 
अरमान कोहली याला नुकतंच एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. घरातून अंमली पदार्थांचा साठा जप्त करत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 1992 मध्ये अरमाननं 'विरोधी' पासून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ज्यानंतर जवळपास 10 वर्षांनी त्यानं 'जानी दुश्मनः एक अनोखी कहानी'मधून पुनरागमन केलं. अरमान 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही झळकला होता. 


1992 मध्ये आलेल्या 'दीवाना' या चित्रपटासाठीही त्याला ऑफर मिळाली होती. पण, रुपेरी पडद्यावर मात्र शाहरुख या चित्रपटातून झळकला होता. अरमाननं अरमाननं हा चित्रपट सोडल्यामुळंच शाहरुखच्या वाट्याला ही संधी आली होती, ज्यासाठी तो त्याचा ऋणी आहे.