मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि या कलाविश्वात असणारी त्याची लोकप्रियता, याविषयी बोलावं आणि लिहावं तितकं कमीच आहे. अभिनय कौशल्याच्या बळावर शाहरुखने पाहता पाहता खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. स्वप्ननगरी मुंबईत आल्यानंतरचा त्याचा प्रवास हा शून्यातून सुरु झाला होता. ज्या स्वप्नांच्याच बळावर तो आज 'किंग खान' या नावानेही ओळखला जातो. शाहरुखच्या याच प्रवासात त्याच्या स्वप्नांना वेगळं वळण देण्यासाठी कारणीभूत ठरली ती म्हणजे काही खास माणसं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख नेहमीच या कलाविश्वात त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाप्रती कृतज्ञतेची भावना व्य़क्त करताना दिसतो. सध्याही त्याने आपल्या दोन खास मित्रांप्रती  भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 


किंग खानचे हे मित्र आहेत. आदित्य चोप्रा आणि करण जोहर. या दोघांविषयी शाहरुखने लिहिलं, 'स्वप्न पाहणं हे चांगलं आहे. पण, त्या स्वप्न पाहणाऱ्यांना जोपर्यंत योग्य दिशा दिली जात नाही, तोपर्यंत हे सारंकाही निरर्थक असतं. या दोन व्यक्तींनी माझं प्रत्येक स्वप्न साकार केलं. सोबतच त्यांचीही स्वप्न साकार केली. आदी आणि करण.....'



आदित्य चोप्रा आणि करण जोहर यांच्याविषयी आपण अचानक असं का लिहितो आहे, याचं स्पष्टीकरण देत तुमच्या स्वप्नांपेक्षा त्यांना सत्यात उतरवणारा, साकार करणाराच सर्वाधिक महत्त्वाचा असतो हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. 


शाहरुखने 'यशराज फिल्म्स' या बॅनरअंतर्गत साकारल्या गेलेल्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली. तर, करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटांतून शाहरुखची कायमस्वरुपी छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली. त्यामुळे आपल्या यशाच मोलाचं योगदान देणाऱ्या या दोघांसाठीही त्याने आभार व्यक्त करणारी ही पोस्ट लिहिली आहे.