Jawan Advanced Booking : मागील काही काळापासून एखाद्या तगडी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाला कमालीची लोकप्रियता मिळणं आणि त्याचे परिणाम चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यात दिसणं ही नवी बाब राहिलेली नाही. शंभर कोटी, दोनशे कोटी असं करता करता चित्रपट 600 आणि 700 कोटी इतका कमाईचा आकडा गाठताना दिसत आहेत. पण, खरंच हे आकडे खरे असतात का? असाच प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांना पडतो. याच प्रश्नाच्या उत्तराजवळ जाणारे संदर्भ सध्या समोर आले आहेत. जे तुम्हालाही हैराण करून सोडतील. 


मागे वळून पाहताना... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच प्रदर्शित झालेल्या Rocky Aur Rani Ki Prem Kahani या चित्रपटासाठी विविध ब्रँड्समध्ये असणारी चढाओढ सर्वांनीच पाहिली. जिथं बड्या ब्रँड्सकडून चित्रपटाची जवळपास 50 हजार तिकीट त्यांचे कर्मचारी आणि ग्राहकांसाठी खरेदी करण्यात आली. त्यामागोमागच आता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या बाबतीतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर 'गदर'च्या दिग्दर्शकांचे आरोपही खरे ठरताना दिसत आहेत. 


हेसुद्धा वाचा : खोटे आकडे सांगत, स्वत: चित्रपटाची तिकिटं खरेदी करतात; 'गदर 2' या दिग्दर्शकांचा निर्मात्यांवर निशाणा


 


'बॉलिवूड हंगामा'नं सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रुपेरी पडद्यावर प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या (Shah rukh khan) शाहरुख खानच्या Jawan चित्रपटासाठी ब्रँड्स भलत्याच उत्साहात आहेत. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी, बस- रेल्वे इतकंच काय तर शक्य त्या सर्व दर्शनीय स्थळांवर याच चित्रपटाची प्रसिद्धी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे इतकंच नव्हे, तर या चित्रपटासाठीची तिकिटंही काहींपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. 


1 लाखांहून अधिक तिकिटं बुक? 


सूत्रांच्या माहितीनुसार सध्या विविध ब्रँड्सनी शाहरुखच्या या चित्रपटाची जवळपास 1 लाख तिकिटं बुक केली असून, सुट्ट्यांसाठी सर्वाधिक बुकींग झाली आहे. जाणकारांच्या मते मोठ्या कलाकारांच्या चित्रपटासाठी ही एक सर्वसाधारण बाब आहे. पण, आता मात्र हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थिरावताना दिसत आहे. 


शाहरुख, आमिर, सलमान, करण जोहर अशा चित्रपटांना ब्रँड्सची बरीच पसंती मिळते. मुळात दक्षिणेकडील कलाजगतामध्ये ही बाब सवयीची आहे. पण, बॉलिवूडमध्येही आता हे प्रस्थ बऱ्याच अंशी वाढताना दिसत आहे. त्यामुळं जसं इतर म्हणतात, बॉलिवूडकरांना दाक्षिणात्य कलाकांरारखी एकी जमली नसली तरी इथं दुसरं गणित मात्र चांगलंच जमल्याचं पाहायला मिळत आहे.