मुंबई : कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा आणि खऱ्या अर्थानं बादशाह असणारा अभिनेता शाहरुख खान ज्याप्रमाणं चर्चेत असतो, त्याचप्रमाणं त्याचे कुटुंबीयसुद्धा अनेकांचं लक्ष वेधतात. त्यातही शाहरुख आणि त्याच्या पत्नीचं नातं म्हणजे अनेक जोड्यांसाठी जणू आदर्शच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंख्य तरुणींच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या मनाचा ठाव घेतला तो म्हणजे त्याच्या पत्नीनं. अर्थात गौरी खान हिनं. किंग खानच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी थक्क करुन जात आहेत. चला तर मग वयाच्या पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या गौरी खानबाबतच्या या खास गोष्टी आहेत का ते जाणून घेऊया... 


- गौरीची लग्नापूर्वीची ओळख होती Gauri Chibber. ती मूळची पंजाब, होशियारपूर येथील कुटुंबातील मुलगी. 


- Colonel Ramesh Chandra Chibber आणि सविता हे तिचे पालक. दिल्लीतील पंचशील पार्क येथे ते वास्तव्यास होते. 


- लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल आणि मॉडर्न स्कूल येथे तिचं शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम महाविद्यालयातून तिनं बीएचं शिक्षण घेतलं होतं. 


- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथून तिनं फॅशन डिझायनिंगच्या शॉर्ट टर्म कोर्सचंही शिक्षण घेतलं. 


- शाहरुख आणि गौरीची पहिली भेट १९८४ मध्ये झाल्याचं म्हटलं जातं. शाहरुख कलाविश्वात येण्यापूर्वी बऱ्याच काळाआधी त्यांची भेट झाली होती. या दोघांनीही २५ ऑक्टोबर १९९१ ला लग्नगाठ बांधली. जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्यचा निर्णय घेतला होता असं म्हटलं जातं. 


- २०१८ मध्ये Fortune magazine मध्ये 'मोस्ट पॉवरफुल वुमन'च्या यादीत ५० उल्लेखनीय महिलांमध्ये तिच्याही नावाचा समावेश करण्यात आला होता. 


- गौरी आणि शाहरुख या दोघांनीही मिळून २००२ मध्ये त्यांची निर्मिती संस्था सुरु केली. रेड चिलीज एन्टरटेन्मेंट असं त्यांच्या कंपनीचं नाव. 


- २०१७ मध्ये गौरीनं स्वत:चा डिझाईन स्टुडिओ सुरु केला होता. 


 


सहजीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर किंग खानला गौरीनं साथ दिली आहे. त्यांचं नातं पाहून कित्येकांना या स्टार कपलचा हेवा वाटल्यावाचून राहत नाही.