मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण शूटिंगदरम्यान शाहिद जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शाहिद गंभीर झाला आहे. शाहिद चंदीगढमध्ये क्रिकेटवर आधारित तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या बॉलिवूड रिमेकचं शूटिंग करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करत असताना, शाहिदच्या ओठांवर बॉल लागल्याने त्याचा ओठ फाटल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉट सुरु होण्यापूर्वी शाहिद एकदम ठीक होता. पण शॉटदरम्यान बॉल अचानक त्याच्या ओठांवर लागला आणि ओठांतून रक्त यायला लागलं. त्यानंतर त्याला लगेगच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी रक्त थांबवण्यासाठी ओठांवर १३ टाके घातले आहेत. शाहिदच्या या परिस्थितीबाबत समजल्यावर त्याची पत्नी मीरा चंदीगढमध्ये दाखल झाली आहे.




गंभीर जखमी झाल्याने शाहिद पुढील काही दिवस चित्रपटाचं शूटिंग करु शकणार नाही. तो पूर्णपण बरा झाल्यानंतर पुन्हा चित्रपटाचं शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. 



गौतम तिन्ननौरी 'जर्सी' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. गौतम तिन्ननौरी यांनीच मूळच्या तेलुगू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. शाहिद कपूर, मृणाल ठाकूर, पंकज कपूर स्टारर 'जर्सी' यंदा ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.