मुंबई : आव्हानात्मक भूमिका पेलत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱे अनेक कलाकार आजवर चर्तेच आले. पण, कित्येकदी अमुक एका चित्रपटानंतर मात्र त्यांच्या वाट्याला सातत्याने यश आलंच असं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात याला अपवादही आहेत. पण, दररोज काही नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होणाऱ्या हिंदी कलाविश्वात स्पर्धा इतकी वाढली आहे, की काही लोकप्रिय सेलिब्रिटींकडेही एक किंवा दोन इतक्याच चित्रपटांचे प्रस्ताव आहेत. किंबहुना एका अभिनेत्याने तर आपण, आता बेरोजगार असल्याचं स्पष्टही केलं आहे. 


कामाविषयी लक्षवेधी वक्तव्य करणारा हा अभिनेता आहे, शाहिद कपूर. 'कबीर सिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या शाहिदने त्याच्या हाताशी असणाऱ्या कामाविषयी अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. 


'सध्याच्या घडीला मी बेरोजगार आहे. कारण, यानंतर (कबीर सिंगनंतर) माझ्याकडे कोणताच चित्रपट नाही आहे. ही परिस्थिती अनेकदा विषण्ण करते. कारण, आपण पुढे काय करणार आहोत, हे मला माहितच असावं लागतं. अर्थात सध्याच्या घडीला चित्रपट माझ्या हाती नसला तरीही इतर अनेक कामं आहेतच. त्यामुळे कायमच मी काहीतरी करत असेन', असं तो म्हणाला.  



शाहिक नेहमीच काही आव्हानात्मक भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने आतापर्यंत साकारालेल्या प्रत्येक भूमिकेत हे वेगळेपण जाणवलं आहे. सध्या तो चर्चेत आहे, ते म्हणजे कबीर सिंग या चित्रपटामुळे. या चित्रपटात तो प्रथमच अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.