मुंबई : बॉलिवूडमधील हँडसम हंक या नावानं ओळखल्या जाणाऱ्य़ा  अभिनेता शाहिद कपूर आणि त्याच्या पत्नीनं कायमच चाहत्यांना कपल गोल्स दिले आहेत. पण, आता याच जोडीच्या नात्याची एक वेगळी बाजू सर्वत्र पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कबीर सिंग' चित्रपटातून शाहिद कपूरनं त्याच्या अभिनयाचं कसब दाखवून दिलं. ज्यानंतर आता त्याच्या नव्या प्रोजेक्टचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 


एकिकडे शाहिदच्या कारकिर्दीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता त्याच्या खासगी आयुष्यात पत्नी मात्र काहीशी चिडलेली दिसत आहे. 


शाहिद आणि त्याच्या पत्नीच्या नात्यात हे वळण नेमकं का आणि कसं आलं, या प्रश्नाचं उत्तर देतोय एक सेल्फी. साधासुधा नव्हे, एक बेडरुम सेल्फी. 


शाहिदनं नुकताच त्याच्या बेडरुममधील एक सेल्फी शेअर करत, 'तुला बेडवर इतक्या साऱ्या उश्या का लागतात?' असा प्रश्न त्यानं मीराला विचारला. 



त्याच्या या फोटोवर मीरानं कमेंट करत तू स्वत:ला अडचणीत टाकतोयस.... असा इशाराच दिला. आता मीराचा हा इशारा नेमका काय सुचित करतो यापेक्षा या व्हिडीओमध्ये नेमकं काय असणार आहे, असाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे. 


दरम्यान, सध्या बी टाऊनचं हे सेलिब्रिटी कपल, त्यांच्या नव्या घरात जाण्यासाठी सज्ज होत आहे. काही दिवसांपूर्वीच या घरातील काम सुरु असतानाच त्या दोघांनी तिथं भेट दिली होती. यावेळी तेथील फोटोही मीरानं इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता.