मुंबई : लग्न म्हटलं की काही ठराविक रंगांच्या कपड्यांना मिळणारी पसंती असो, किंवा मग रोषणाईचा झगमगाट आणि मोठमोठाले मंडप असो. कोणतीही कसर कमी ठेवली जात नाही. पण, काही लग्न मात्र यापलीकली असतात. जिथं दिखाव्यापेक्षा नात्याला, वचनांना महत्त्वं दिलं जातं. असंच एक लग्न होतं, कपूर कुटुंबातील लाडक्या लेकिचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्तपदी न घेता, अग्नीला साक्षी न ठेवता, गळ्यात मंगळसूत्र न बांधताही ती विवाहबंधनात अडकली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिनं ज्याच्यावर प्रेम केलं, त्याचाच पती म्हणून स्वीकारही केला. 


ही लाडकी लेक म्हणजे अभिनेता पंकज कपूर यांची मुलगी, सना. मयांक पाहवा, याच्याशी तिनं एका अनोख्या पद्धतीनं लग्न केलं. अभिनेता मनोज पाहवा आणि अभिनेत्री सीमा पाहवा यांच्या मुलाशी लग्न करत सना या कुटुंबाची सून झाली. (Bollywood Actor shahid kapoor sister Sanah Mayank pahwa wedding video)


शाहिद कपूरची ही लाडकी बहिण विवाहबंधनात अडकताना मोठा भाऊ म्हणून तोसुद्धा प्रचंड आनंदात दिसला. अभिनेते नसिरुद्दीन शाह आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह अर्थात सनाची मावशी या दोघांनीही लग्नसोहळ्यामध्ये तिच्यावर प्रेमाची आणि आशीर्वादांची बरसात केली. 



लग्नबंधनात अडकताना सना आणि मयांकनं एकमेकांना वचनं दिली, चांगल्यातल्या चांगल्या आणि वाईटातल्या वाईट दिवसांमध्ये एकमेकांची साथ निभावण्याची ही वचनं देत असताना या दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव पाहताना नकळतच तिथं उपस्थित असणाऱ्यांचेही डोळे पाणावले. 


लग्नसोहळ्याला काही महिने उलटले, ज्यानंतर आता या सोहळ्याचा एक सुरेख व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हालाही तुमच्या लग्नातील असेच काही क्षण आठवतील यात शंकाच नाही.