Siddarth Malhotra on His Struggling Days: एकेकाळी मॉडेल असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं (Siddharth Malhotra) गेल्या वर्षात मोठी मजल मारली आहे. परंतु आजही त्याला आपल्या संघर्षातील अनेक दिवस आठवतात ज्याची आठवण तो आजही प्रेक्षकांना करून देतो त्याच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली आहे. (bollywood actor siddharth malhotra reveals about his struggling days says family used to laugh at him)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थला कधीच असं वाटलं नव्हतं की तो आपला ठसा कधी या क्षेत्रात उमटवू शकेल. तसेच त्याच्या परिवारालाही असं कधीच वाटलं नव्हतं त्यातून त्याच्या घरचेच त्याच्या अभिनेता होण्याच्या स्वप्नावर हसायचे. या मुलाखती दरम्यान सिद्धार्थ आपल्या आयुष्यातील चढउतार शेअर केले आहेत. (Siddharth Malhotra recent Interview)


या मुलाखतीदरम्यान सिद्धार्थने सांगितले की, जेव्हाही मी अभिनेता होण्याचे स्वप्न कोणाला सांगायचो तेव्हा ते माझी कायम खिल्ली उडवायचे. मला वाटतं की एवढ्या मोठ्या सेटवर (पहिल्या चित्रपटात) राहणं माझ्यासाठी पहिल्यांदाच खूप अवघड होतं. नवी दिल्लीत राहून मी नोकरी करायचो त्याचप्रमाणे मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो होतो. 


आणखी वाचा - 'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ
 
मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अभिनेता होणं म्हणजे फार लांबची गोष्ट होती असे माझ्या घरचे मला सांगायचे. मी अभिनेता बनून मोठ्या पडद्यावर येऊ शकतोस यावर विश्वास ठेवणं माझ्या घरच्यांसाठी फारच कठीण होते. ते माझी चेष्टा करायचे. माझ्या कुटुंबाने मला कधीच गांभीर्याने घेतले नाही. कारण मी लहान होतो म्हणून मला अनुभव आलेला नाही. तेव्हा मी वेगळं काय करणार असा प्रश्न त्यांना पडायचा. पण आता मला मिळालेल्या व्यावसायिक यशाने त्यांची खात्री पटली आहे असं तो म्हणतो. 



कॅप्टन विक्रम बत्राच्या (Vikram Batra) जीवनावर आधारित चित्रपटाने त्याचे नशीबचं बदललं. आता सिद्धार्थ अजय देवगणच्या (Thank God) थॅक गॉड या चित्रपटातून दिसणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty's Police Force) सोबत इंडियन पोलिस फोर्स, मिशन मजनू (Mission Majnu) आणि योद्धा (Yodha) या अशा चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.