Sunil Shetty Watch Price: सुनील शेट्टी (Sunil Shetty) बॉलिवूडच्या अशा अभिनेत्यांपैकी आहे, ज्यांनी शून्यापासून आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना सुनील शेट्टीने आपल्या कष्टाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली असून आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. सुनील शेट्टी अभिनेत्यासह व्यावसायिकदेखील असून अत्यंत ऐशोआरामात जीवन जगत आहे. नुकतंच सुनील शेट्टीची मुलगी आथियाच लग्न भारतीय क्रिकेटर के एल राहुलसोबत (Athiya KL Rahul Marriage) पार पडलं. सुनील शेट्टीने मुलीच्या लग्नात खास कपडे परिधान केले होते. लुंगी आणि कुर्त्यामधील सुनील शेट्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान आता सुनील शेट्टीने घातलेल्या घड्याळाची (Sunil Shetty Watch Price) चांगलीच चर्चा रंगली आहे. या घड्याळाची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्च वाटेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. अत्यंत थाटामाटात काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आथिया शेट्टी आणि के एल राहुल विवाहबंधनात अडकले. दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुनील शेट्टीचा लूकही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नानंतर सुनील शेट्टीने प्रसारमाध्यमांना मिठाई वाटत आनंद साजरा केला. दरम्यान यावेळी त्याने हातात घातलेलं घड्याळही चर्चेचा विषय ठरलं होतं. पण या घड्याळाची किंमत काय असावी याचा कोणाला अंदाज नव्हता. पण आता या घड्याळाची किंमत समोर आली असून, ती समजल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे. 


सुनील शेट्टीच्या घड्याळाची किंमत


सुनील शेट्टीने घातलेल्या घड्याळाची माहिती इंडियन वॉच कॉनेसरने (indianwatchconnoiseur) आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर (Instagram) दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सुनील शेट्टीचा आणि घड्याळाचा फोटो एकत्र केला असून त्याची किंमत सांगितली आहे. Hublot ब्रॅण्डच्या या घड्याळाचा बेस 18 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आला आहे. या घड्याळाची किंमत 25 लाख रुपये आहे.तर रिटेल किंमत 27 लाख, 24 हजार 900 रुपये इतकी है.



सुनील शेट्टी अभिनेत्यासोबत एक यशस्वी उद्योजकही आहे. एका फोटोशूटच्या आधारे सुनील शेट्टीला 'बलवान' हा आपला पहिला चित्रपट मिळाला होता. या चित्रपटात त्याने आपली शरिरयष्टी दाखवल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना सुनील शेट्टीने एकदा सांगितलं होतं की "एक वेळ होती जेव्हा माझे चित्रपट चालत नव्हते. मी अनेकदा रडायचो आणि अभिनेता होण्याच्या आपल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचो".