मोठ्या पडद्यावर अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणार सनी देओल (Sunny Deol) खऱ्या आयुष्यात मात्र शांत स्वभावाचा आहे. चित्रपटांमध्ये आपल्या खणखणीत आवाजात संवादफेक करत गेली कित्येक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा सनी देओल रिअल लाईफमध्ये फारच लाजरा आणि मितभाषी आहे. पण जेव्हा त्याच्या संतापाच पारा चढतो तेव्हा मात्र तो चित्रपटांमध्ये दिसतो त्यापेक्षाही जास्त असतो. असाच किस्सा एका शुटिंगदरम्यान झाला होता. तेव्हा शाहरुख खानवर (Shahrukh Khan) संतापलेल्या सनी देओलने संतापाच्या भरात आपली जीन्सच फाडून टाकली होती. बॉलिवूडमध्ये आजही हा किस्सा प्रसिद्ध आहे. याच चित्रपटानंतर सनी देओलने पुन्हा कधीच शाहरुखसह काम केलं नाही. 


नेमकं असं काय झालं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किस्सा 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डर' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटात सनी देओलसह शाहरुख खान आणि जुही चावला प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटात सनी देओल हिरो तर शाहरुख व्हिलनच्या भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. चित्रपटाची स्टोरी आणि गाणी दोन्हीही प्रेक्षकांनी प्रचंड आवडलं होतं. 'तू है मेरी किरण' हे गाणं तर आजही तितक्याच आवडीने ऐकलं जातं. पण या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट होत असताना असं काही घडलं होतं की, सनी देओलचा राग अनावर झाला होता. 


संतापलेल्या सनी देओलने जीन्सच फाडून टाकली


सनी देओलनेच एका टीव्ही शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. या चित्रपटात सनी देओलने कमा़डो ऑफिसरची भूमिका निभावली होती. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये शाहरुख खान सनी देओलवर चाकूने वार करतो असं दृश्य होतं. पण सनी देओलला ही गोष्ट पटत नव्हती. 


मी चित्रपटात कमांडो ऑफिसर असून इतका फिट असताना कोणीही इतक्या सहजतेने मला चाकू कसं काय मारु शकतं असा सनी देओलचा युक्तिवाद होता. यावरुन सनीची दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याशी बाचाबाची झाली. पण आपलं म्हणणं समजून घेत नसल्याने सनी देओल संपातला होता. पण आपला राग व्यक्त करु शकत नसल्याने त्याने दोन्ही हात जीन्सच्या खिशात ठेवले होते. हा संताप इतका वाढला की, शेवटी सनीने आपली जीन्सच फाडून घेतली होती.


सेटवर एकच धापवळ


सनी देओलचा राग सर्वांनाच माहिती असल्याने त्याने जीन्स फाडताच सेटवर एकच धापवळ सुरु झाली होती. सनी देओलने त्या कार्यक्रमात सांगितलं होतं की, लोक घाबरुन सैरवेर पळत होते. आपण त्यावेळी काहीच बोललो नाही. पण आपला मुद्दा योग्य होता यावर तो अद्यापही ठाम आहे. 


सनी देओलने 'बेताब' चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. पहिल्या चित्रपटानंतरच सनी देओल सुपरस्टार झाला. सनी देओल आणि अमृता सिंगच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. 90 च्या दशकात सनी देओलने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ज्यामध्ये त्रिदेव’, अर्जुन, डकैत, घायल, लुटेरे, जीत, घातक, बॉर्डर, जिद्दी असे अनेक चित्रपट आहेत. दरम्यान लवकरच सनी देओल आपला सुपरहिट चित्रपट 'गदर'च्या सिक्वेलच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.