मुंबई : बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या करुन जीवन संपवलं. ज्यानंतर त्याच्या आत्महत्येप्रकरणीचा तपास दर दिवशी एका वेगळ्या वळणावर आल्याचं पाहिलं. मुंबई पोलीस, सीबीआय आणि एनसीबी अशा तपास यंत्रणांकडून या घटनेचा तपास करण्यात आला. मुळात सुशांतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील काही अनुत्तरित प्रश्न समोर आले. ज्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अनेक बी- टाऊन कलाकार आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut हिसुद्धा त्याच कलाकारांपैकी एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द कंगनाने या मुद्द्यावर काही गौप्यस्फोटही केले. इतकंच नव्हे तर, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत सुरु असणाऱ्या संघर्षादरम्यानच आता पुन्हा एकदा मुंबईतून काढता पाय घेतलेल्या कंगनानं महाराष्ट्र शासनावर टीकेची झोड उठवली आहे. 


महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणारी कंगना आता थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता असा सूर तिनं ट्विच्या माध्यमातून आळवला.



 


'राज्यात सध्या सत्तेत असणाऱी भ्रष्ट सोनिया सेना जी माफियांना पाठिशी घालते, त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांनी त्यांचं काम योग्य मार्गानं केलं असतं. नागरिक आणि जनतेला त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता', असं तिनं लिहिलं. कंगनाचं हे ट्विट पाहता आता तिला नेमकं कोण आणि काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.