मुंबई : दोन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलच धुमसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणीचा अधिकृत तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. ज्यानंतर सीबीआयचं एक पथक मुंबईत दाखल झालं. मुंबईत येताच अतिशय वेगानं या प्रकरणीच्या तपासाची नव्यानं सुरुवात झाली. ज्यामध्ये काही धक्कादायक खुलासे समोर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सीबीआय अनेकांचीच चौकशी करत असून, सुशांतच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीबीआयच्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. यातच आता त्याचा नवा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामधून पुन्हा एकदा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 


सुशांतच्या मानेवर लिगेचर मार्क म्हणजेच एक खोल खूण असल्याचं उघड झालं आहे. या अहवालात नमूद केल्यानुसार सुशांतच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, त्याच्या दातांची ठेवण नीट होती. त्याचे डोळे अर्थवट उघडलेले होते असंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं. 


सुशांतच्या तोंडातून किंवा कानातून फेस आला नव्हता हेसुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सुशांतच्या हनुवटीखाली फासाची खूण असून, मानेच्या खाली 33 सेंटीमीटर इतकं लिगेचर मार्क मात्र पाहायला मिळालं. सध्या समोर आलेल्या या माहितीतून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत आहे. मात्र, याबाबतची सुशांतच्या वडिलांच्या वकिलांकडून प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे. 


 


सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सुरु असतेवेळी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती त्या ठिकाणी उपस्थित असल्याचंही कळत आहे. रिया त्या वेळी तिथे काय करत होती, याचाच आता तपास सुरु असून, येत्या काळात नेमक्या कोणत्या गोष्टी तपासादरम्यान समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.