मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत नुकताच त्याच्या युरोप टूरवरुन मुंबईत परत आला. याच दरम्यान त्याची तब्येत बिघडली. तपासणी केल्यानंतर सुशांतला डेंग्यू झाल्याचं समोर आलं आहे. सुशांतला डेंग्यूचं निदान झाल्यानंतर त्याने त्याचे पुढचे कार्यक्रम रद्द केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतला एका कार्यक्रमासाठी अबू धाबीला जायचं होतं पण, डेंग्यूमुळे त्याला प्रवास रद्द करावा लागला आहे. डॉक्टरांनी सुशांतला आराम करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे.



सोशल मीडियावर डेंग्यू  झाल्याचं समोर आल्यानंतर सुशांतला त्याच्या चाहत्यांकडून लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. सुशांतआधी श्रद्धा कपूर, धर्मेंद्र, मोहसीन खानलाही डेंग्यू झाल्याचं समोर आलं होतं. 


सुशांत लवकरच आगामी 'दिल बेचेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशांत आणि श्रद्धा कपूर स्टारर 'छिछोरे' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेक्षकांची चित्रपटाला पसंतीही मिळाली होती. आता आगामी चित्रपटातून सुशांत काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


  


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत राहतं घर सोडल्यामुळे चांगलाच चर्चेत आला. मीडिया रिपोर्टनुसार त्यानं फक्त घर सोडलं नाही तर, रिया चक्रवर्तीच्या घरी तो राहण्यासाठी गेला आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तनुसार सुशांतला त्याच्या घरातून सामान घेवून जाताना कैद करण्यात आलं होतं.