मुंबई : स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींचं हे स्वप्न अतिशय सहजपणे साकार होतं. तर, काहींना यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळणाला दिलासा आणि आनंद शब्दांतही मांडता येत नाही. अशाच आनंदाचा अनुभव घेत आहे, अभिनेता टायगर श्रॉफ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या बऱ्याच काळापासून टायगरनं स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि अखेर त्यानं हे स्वप्न साकार केलं. सूत्रांच्या माहितीनुसार टायगरनं मुंबईतील खार येथे असणाऱ्या अतिशय उच्चभ्रू वस्तीमध्ये रुस्तमजी पॅरामाऊंट येथे घर खरेदी केलं. 


टायगरने घर घेतल्याचं कळताच माध्यमांमध्ये या प्रोजेक्टच्या वेबसाईटवरुन घराच्या अंतरंगांचे फोटो व्हायरल झाले. टायगरनं या प्रोजेक्टमध्ये घर खरेदी करण्यासाठी 31.5 कोटी इतकी दणदणीत रक्कम मोजल्याचं कळत आहे. या घरामध्ये टायगर त्याचे आई-बाबा आणि बहीण यांच्यासमवेत राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


कमी वयातच टायगरनं घेतलेलं घर आणि त्यामध्ये असणाऱ्या सोईसुविधा पाहता अंबानींनाही लाजवेल अशीच या कलाकाच्या घराची शान आहे, असं म्हणायला हरकत नाही. टायगरच्या या घराच्या इंटेरिअरची जबबादारी त्याच्या आईनं आणि अलान अब्राहम यांनी घेतली आहे. या नव्या घराला स्विमिंग पूलही असल्याचं कळत आहे. लेकानं घेतलेलं हे घर पाहून टायगरचे बाबा, अभिनेता जॅकी श्रॉ़फ यांनीही आनंदाची भावना व्यक्त केली. 


मुंबई म्हटलं की समुद्र आणि समुद्र म्हटलं कि तिथून दिसणारा सूर्यास्त आलाच. टायगरनं खरेदी केलल्या या नव्या घराच्या इमारतीला एक स्काय लाऊंज असल्याचंही म्हटलं जात आहे. या स्काय लाऊंजमधून विस्तीर्ण समुद्राची झलक आणि रंगीत छटांची उधळण करणारा सूर्यास्त पाहण्याची संधी मिळत आहे.