मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ ही बॉलिवूडमधील भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. कृष्णाच्या ग्लॅमरस अदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेसनंच आपलं आयुष्य बदललं असं कृष्णा सांगते. योग्य वेळी तिनं हा निर्णय़ घेतला नसता, तर आज हे सारंकाही नसतं असंच ती म्हणते. हल्लीच कृष्णानं याबाबतचा खुलासा केला. 


प्रेमप्रकरणामध्ये ब्रेकअप, अर्थात प्रेमभंगाचा सामना केल्यानंतर ती पुरती तुटली होती. नेमकं काय करावं याचं तिला भानही नव्हतं. अशा वेळी एक आशेचा किरण तिला दिसला. 


'मी त्यावेळी ठरवलं, की आतापासून आपल्या शारीरिक सुदृढतेवर अधिक लक्ष द्यायचं. सध्यापासून जवळपास पाच- साडेपाच वर्षांपूर्वी मी स्वत:साठी हा निर्णय घेतला होता', असं कृष्णा म्हणाली. 


पहिल्यांदाच जेव्हा तिनं जिममध्ये पाय ठेवलं, तेव्हा मी मनातून खचले होते असं सांगत आपला ब्रेकअप झाल्यानंतरचं वास्तव तिनं समोर ठेवलं. 


पहिलं नातं, पहिला प्रियकर, जीवनातील पहिलं रिलेशनशिप तुटणं हे सारंकाही तिला हादरवणारं होतं. पण, हा पहिला अनुभव तिला फार शिकवणारं होतं. 


पहिल्या रिलेशनशिपमध्ये कृष्णानं समोरच्या व्यक्तीला जास्त महत्त्वं देत ती स्वत:ला विसरुन गेली होती. पण, हा प्रवास अर्ध्यावरच संपल्यानंतर मात्र तिनं स्वत:कडे लक्ष देण्यास सुरुवात केली. 


जीवनात यापुढे जो बदल होईल, तो माझ्यासाठीच सेल असं ठरवत तिनं फिटनेसवर लक्ष दिलं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कृष्णा सुदृढ आणि सक्षम झाली. 


स्वत:मध्ये अमूलाग्र बदल करु इच्छिणाऱ्या कृष्णानं मोठ्या आत्मविश्वासानं हा प्रवास केला. यामध्ये तिनं खाण्यापिण्याच्या सवयींपासून लहानसहान गोष्टींवर अधिक भर दिला आणि स्वत:ला नव्याने घडवलं.