मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या खासगी आयुष्यातील वादळातून आता काहीशी सावरताना दिसत आहे. नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आणि पुरेसा वेळ स्वत:ला दिल्यानंतर आता समंथा तिच्या कामात रमत आहे. (Samantha Ruth prabhu)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ही सौंदर्यवती मुंबईत आलेली आहे. विमानतळावरच हिंदी येतं का, अशा प्रश्नानं तिचं स्वागत करण्यात आलं. ज्यानंतर आता समंथाच्या अवतीभोवती माध्यमांचा गराडा आणि एका लोकप्रिय अभिनेत्याचं सुरक्षा कवच दिसलं. 


 'Citadel' साठी समंथा आणि हा अभिनेता सध्या एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे. काही का असेना, त्यांचं एकत्र येणं बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेलं. 


हा अभिनेता आहे वरुण धवन. वरुण आणि समंथा एके ठिकाणहून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याभोवती छायाचित्रकारांनी गर्दी केली. हे सर्व समंथासाठी अनपेक्षित होतं. 


ती काहीशी गोंधळली, पण लगेचच वरुणनं परिस्थिती सांभाळत अरे तिला घाबरवू नका असं म्हणत गर्दीतून तिला बाहेर काढण्यास मदत केली. 



समंथाला स्पर्शही न करता आणि इतर कोणाचा तिला धक्काही लागू न देता त्यानं कारपर्यंत नेलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. 


एक अभनेत्री आणि सहकलाकार म्हणून वरुण समंथाची काळजी घेताना दिसला. यावेळी महिलांप्रती त्याच्या मनात असणारा आदरही दिसला. एकिकडे समंथाशी असं वागणारा वरुण पाहता, नागानंही विचार करावा असाच सूर काही नेटकऱ्यांनी आळवला.