अखेर कतरिनाच्या आयुष्यात मिस्टर परफेक्टची एंट्री?
कलाविश्वात या जोडीविषयी चर्चांना उधाण
मुंबई : सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्याशी अभिनेत्री Katrina Kaif कतरिना कैफचं नाव अनेकदा जोडलं गेलं. किंबहुना रणबीरसोबत ती लिव्हइन रिलेशनशिपमध्येही होती. पण, त्यांचं हे नातं फार काळ टीकू शकलं नाही. रणबीरसोबत वेगळं झाल्यांनंतर कतरिनाने या परिस्थितमध्ये स्वत:ला सावरत करिअरला प्राधान्य दिलं. आता याच कतरिनाच्या जीवनामध्ये अखेर तिच्या मिस्टर परफेक्टची एंट्री झाल्याचं म्हटलं जात आहे.
कॅटच्या जीवनात आलेला हा मिस्टर परफेक्ट आहे तरी कोण, असाच प्रश्न तुमाहालाही पडला ना? गेल्या काही दिवसांपासून कतरिना पुरस्कार सोहळे म्हणू नका, एखादा कार्यक्रम म्हणू नका किंवा मग डिनर डेट अशा विविध ठिकाणी एका व्यक्तीसोबत अनेकदा दिसली आहे. ही व्यक्ती म्हणजेच असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal.
एका रिऍलिटी शोदरम्यान कतरिनाने आपल्याला विकीसोबत स्क्रीन शेअर करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासून हा भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला. हल्लीच विकीच्या भावाची भूमिका असणाऱ्या The Forgotten Armyच्या स्क्रीनिंगच्यावेळीसुद्धा ती विकीसोबतच दिसली. आता खुद्द विकीनेच कतरिनासोबतच्या त्याच्या नात्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या.
एका मुलाखतीदरम्यान, आपल्या म्हणण्याचा कशा प्रकारे विपर्यास करुन त्या गोष्टी पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यात किती गोष्टी वाढीव किंवा त्यातून किती गोष्टी वगळण्यात आलेल्या असतात हे स्पष्ट केलं. तर, प्रेम ही एक सर्वोत्तम भावना असल्याचंही त्याने सांगितलं. कतरिनाबाबत आपल्याला कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचं म्हणत खासगी आयुष्याविषयी आपण कधीही कोणाशीही खोटं बोलत नसल्याचं त्याने सांगितलं.
वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप
मी सध्या अतिशय सुरेख भावनेची अनुभूती घेत असल्याचं सांगत विकीने काहीही न बोलताही या नात्याविषयी तो बरंच काही बोलून गेल्याची चर्चा कलाविश्वात सुरु झाली आहे. 'कोणीही प्रेमात असेल तेव्हा ते जीवनातील अतिशय सुरेख अशा काळात असल्याचीच भावना त्यांच्या मनात असते. त्यावेळी तो (व्यक्ती) जे काही करतो ते सर्वस्वाने केलेलं असतं. त्यामागच्या भावना चांगल्याच असतात, हेतू चांगले असतात. माझ्या मते ही खरंच एक अद्वितीय भावना आहे', या शब्दांत विकीने प्रेमाची त्याची परिभाषा सर्वांपुढे ठेवली. विकीचे हे विचार आणि सध्या चर्चेत असणारं कतरिनासोबतचं त्याचं नातं पाहता आता येत्या काळात ही सेलिब्रिटी जोडीही त्यांच्या नात्याची अधिकृत ग्वाही देणार का याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल.