बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आपल्या स्टंटसाठी ओळखला जातो. 'क्रॅक' (Crakk) चित्रपटात चाहत्यांनी त्याला अखेरचं पाहिलं होतं. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या या चित्रपटात त्याने अभिनयासह निर्मितीही केली होती. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप झाल्याने त्याला करोडोंचं नुकसान सहन करावं लागलं होतं. पण हे नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने एक नोकरी केली. नुकसान भरपाईसाठी त्याने फ्रान्समधील एका सर्कसमध्ये काम केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्युत जामवालचा 'क्रॅक' चित्रपट फेब्रुवारी महिन्यात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17 कोटींचा गल्ला जमवला होता. पण चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी 45 कोटी खर्च करण्यात आले होते. विद्युत जामवालचा फ्लॉप झालेला हा सलग दुसरा चित्रपट होता. याआधी त्याचा स्पाय थ्रिलर 'आयबी 71' चित्रपटही रिलीज झाला होता. या चित्रपटाचा तो सहनिर्माता होता. 40 कोटींमध्ये तयार कऱण्यात आलेल्या या चित्रपटाने 29 कोटींची कमाई केली होती. 


सर्कसमध्ये केलं काम


'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत विद्युत जामवालने आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आपण नेमकं काय केलं याची माहिती दिली. त्याने सांगितलं की, "क्रॅक चित्रपट फ्लॉप झाल्याने मी भरपूर पैसे कमावले होते. आता याचा सामना कसा करायचा हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. तुम्ही पैसै गमावल्यानंतर भरपूर सारे सल्लेही मिळतात. ज्या लोकांनी भूतकाळाता पैसे गमावले आहेत आणि ज्या मित्रांना खरंच तुमची चिंता असते ते तुम्हाला सल्ले देत असतात. माझ्यासाठी या सर्व सल्ल्यांपासून दूर होणं महत्त्वाचं होतं. क्रॅकच्या अपयशानंतर मी फ्रान्सच्या एका सर्कससोबत जोडलो गेलो. मी त्यांच्यासह जवळपास 14 दिवस घालवले".


पुढे त्याने सांगितलं की, "एक चांगला कलाकार तो असतो जो शरिराला एका अशा स्तरावर नेतो जे अनेकदा अशक्य असतं. यामुळेच जेव्हा मी एखाद्या कलाकाराला पाहतो तेव्हा मनात हाच विचार येतो की, 'अरे देवा कोणी असं कसं असू शकतं'. जेव्हा मी सर्कसमध्ये असतो तेव्हा त्या रुममधील सर्वात लहान व्यक्ती असतो. मी त्या लोकांसह काही वेळ घालवला आणि त्यानंतर जेव्हा मुंबईत परतलो तेव्हा सगळं काही शांत झालं होतं".


विद्युत जामवाल चित्रपट रिलीज झाल्यानंतर तीन महिन्यात कर्जमुक्त झाला होता. यानंतर त्याचे मित्र त्याला तू हे कसं काय शक्य केलंस असं विचारत होते.