`लैंगिक हिंसेच्या सीननंतर झोप उडाली, उलट्या झाल्या...`; अभिनेत्याचा मोठा खुलासा
Imran Khan After Giving Physical Assault Scene : बॉलिवूड अभिनेत्यानं चित्रपटातील लैंगिक हिंसेचा सीन शूट केल्यानंतर काय झालं याचा खुलासा केला आहे.
Imran Khan After Giving Physical Assault Scene : बॉलिवूड अभिनेता इमरान खान नेहमीच चित्रपट आणि सोसायटी या सगळ्या गोष्टींवर चर्चा करताना दिसतो. इमराननं जेव्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा त्याची रोमॅन्टिक अशी इमेजी तयार झाली होती. तर आता त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या 'किडनॅप' या चित्रपटाविषयी सांगितलं की कशा प्रकारे चित्रपटातील एका सीनमुळे त्याला खूप त्रास झाला होता.
इमरान खाननं ही मुलाखत ‘वी आर युवा’ या युट्यूब चॅनलला दिली आहे. या मुलाखतीत इमरानला प्रश्न विचारण्यात आला की असा कोणता चित्रपट आहे का, जो केल्याचा पश्चाताप आहे. यावेळी इमराननं 'किडनॅप' चित्रपटातील एका सीनविषयी खुलासा केला की अभिनेत्री मिनिषा लांबाच्या हातावर वळ उठले होते. त्याविषयी सविस्तर सांगत इमरान म्हणाला, 'किडनॅपमध्ये एक असा भाग आहे जो मला खूप अनकम्फर्टेबल वाटला. या चित्रपटात 'मौसम' नावाचं एक रोमॅन्टिक गाणं होतं आणि त्यानंतर तो लैंगिक शोषणाचा सीन होता. या चित्रपटात ती भूमिका अभिनेत्रीला खेचत गुफेत घेऊन येते तेव्हा असं वाटतं की तो लैंगिक शोषण करणार आहे. तर तो सीन तसाच सुरू होतो आणि मग तो थांबतो आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी हा सीन शूट करणं खूप कठीम होतं.'
त्यानं पुढे सांगितलं की 'मी त्या सीक्वेंसचं शूट करण्यासाठी संपूर्ण दिवस घेतला आणि त्या दिवशी मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मी अस्वस्थ असल्याचं मला जाणवू लागलं. मी झोपू शकलो नाही, मला उलट्या येत होत्या. ते सगळं मी माझ्या डोक्यातून काढू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी मिनिषाकडे गेलो आणि तेव्हा पाहिलं की ज्या ठिकाणी मी तिला पकडलं होतं, तिथे तिला जखमा झाल्या आहेत. तेव्हा मी लगेच म्हणालो देवा मी हे काय केलं?'
हेही वाचा : लग्नाआधीच मृणाल ठाकूर आई! स्वत:च केला खुलासा, म्हणाली, 'आता जे होईल ते माझं दुसरं...'
पुढे इमरान म्हणाली, 'मी तिच्यासोबत बसलो आणि मी म्हटलं की मला याविषयी बोलणं गरजेचं आहे कारण हे सगळं ज्या प्रकारे झालं मी अनकम्फर्टेबल होते. तिला या सगळ्याचं काहीच वाटलं नाही ती एगदी शांत होते. पण मी कधीच असं केलं नाही तर तिनं मला शांत केलं. पण हा सीन माझ्या डोक्यात घर करून आहे.'