मुंबई : बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीनं AudiQ7 ही आलिशान कार खरेदी केली. मोठ्या आनंदात तिनं ही कार दाराशी आणली. कार घेण्यासाठीही गेलं असता तिनं सोबर लूकला प्राधान्य दिलं होतं. कार हाती आल्यानंतर तिनं सर्वप्रथम तिची पूजा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनाजोगी कार आपल्या हाती आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. लाखोंच्या घरात सुरुवात होत थेट कोट्यवधींच्या घरात दर जाणारी AudiQ7  खरेदी करणारी ही अभिनेत्री आहे, अदिती राव हैदरी. 


अदितीच्या दिसण्यावर भाळणारे असंख्य चाहते आहेत. तिचं रुप पाहताना त्यामध्येच वेगळेपण झळकत असल्याचं अनेकांचं मत. 


अदिती एका शाही कुटुंबाची लेक आहे. अदितीचे आजोबा राजा जे रामेश्वर राव वानपर्ती (सध्याचं तेलंगाणा) संस्थानचे राजे होते. ज्यामुळं हा शाही थाट तिच्या रक्तात भिनला आहे. 


अदितीचं राहणीमान आणि तिची एकंदर पेहरावाची शैली निरखुन पाहिली असता, त्यातही राजेशाही थाट झळकतो, ही बाब नाकारता येणार नाही. 



राजघराण्यातील असल्यामुळं अदितीच्या वागण्याबोलण्यातही हा अंदाज उपजतच आला आहे. तिच्याकडे पाहताना याची जाणीवही होते. 



विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका अदितीनं आजवर साकारल्या आहेत. मध्यवर्ती भूमिकांमध्ये ती तुलनेनं कमीच झळकली. पण, आपल्या वाट्याला असणाऱ्या भूमिकांना न्याय देण्याकडेच तिचा कल दिसून आला.