जीव धोक्यात घालत अभिनेत्रीची योगसाधना; बिकीनीतील लूक पाहून चाहते घायाळ
ठाकरे कुटुंबातील व्यक्तीशी खास नातं...
Yoga Video: बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये अभिनेत्री अलाया एफ हिच्याही नावाचा समावेश होतो. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर या अभिनेत्रीनं विविध कारणांनी सर्वांच्या नजरा वेधल्या. मग ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाशी असणारी तिची मैत्री असो किंवा आणखी काही.
सध्या अलाया चर्चेत आली आहेत, ते म्हणजे तिनंच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओमध्ये अलाया पुन्हा एकदा योगसाधना करताना दिसत आहे. योगाभ्यासामध्ये ती किती पारंगत आहे हेच हा व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे.
अलायानं शेअर केलेला व्हिडीओ वेधतोय लक्ष
अलायानं शेअर केलेला हा व्हिडीओ मालदीवमधील असल्याचं लक्षात येत आहे. ज्यामध्ये ती एका सी व्हूईंग डेकच्याही पुढे लावण्यात आलेल्या जाळीवर योगा करताना दिसत आहे. बरं, तिनं स्वत:च आपण जीव धोक्यात घातल्याची बाब कॅप्शनमध्ये लिहिली आहे.
धोका पत्करून योगा करणं कमाल होतं, असं म्हणत अलायानं हा व्हिडीओ शेअर केला आणि अवघ्या काही क्षणांतच तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
वर्षानुवर्षे सातत्यानं योगा केल्यानंतर शरीरात आलेली लवचिकता आणि या साधनेमध्ये असणारं प्रभुत्वं अलायाचा हा व्हिडीओ पाहताना लगेचच लक्षात येत आहे.