मुंबई : चित्रपटाच्या निमित्तानं सुरु झालेली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची प्रेमकहाणी आणि या प्रेमाच्या नात्याची विविध रुपं सर्वांनीच पाहिली. रिलेशनशिपमध्ये आल्या क्षणापासून आलिया आणि रणबीरने त्यांच्या या नात्याला आणखी खुलवण्याचाच प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन महिन्यांपूर्वीच या जोडीनं लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला नवं नाव, नवी ओळख दिली. आता तर म्हणे ही जोडी बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. पण, यातच त्या दोघांच्याही प्रेमाचा एक शत्रूही समोर आला आहे. (Bollywood Actress Alia Bhatt actor Ranbir Kapoors enemy who is that)


आलिया आणि रणबीरचं प्रेम नेमकं कोणाला खटकतंय? तुम्हालाही प्रश्न पडतोय ना? ज्याला रणबीर आलियानं मित्र मानलं तोच अयान मुखर्जी म्हणजेच त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्ररपटाचा दिग्दर्शक आता त्यांचा शत्रू ठरत आहे. 


याच चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि आलियाची जवळीक वाढली. त्यांचं प्रेम आणखी बहरलं. खुद्द असाननंच आपण त्यांच्या प्रेमकहाणीमध्ये खलनायकी भूमिका कशी बजावली याचा खुलासा केला. 


'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणे आलिया-रणबीरच्या प्रेमाविरोधात होता. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजच्या वेळी त्याने ही मजेशीर स्टोरी सांगितली. 'जेव्हा आम्ही सर्वजण चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटलं की आलिया आणि रणबीरची कास्टिंग सर्वोत्तम आहे. दोघंही एकत्र खूप छान दिसत होते. त्यानंतर जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं तेव्हा दोघांची मैत्री झाली. त्यांची मैत्री वाढत गेली आणि बघता बघता ते एक क्युट कपल ठरले', असं अयान म्हणाला. 


कोण आहे लव्हस्टोरीतला व्हिलन  ?
अयाननं जणू आलिया आणि रणबीरला नजरकैदेत ठेवलं होतं. कारणही तसंच होतं. अयान या जोडीला संपूर्ण जगापासून दूर ठेवू इच्छित होता. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्या दोघांनाही कोणी एकत्र पाहू नये यासाठीच तो प्रयत्न करत होता. 


जेव्हा केव्हा ही जोडी एकत्र बाहेर जात होती, तेव्हा तेव्हा अयानही त्यांच्यासोबत होता. तुम्ही त्यावेळचे फोटो पाहिले तर लक्षात येईलच. 



तुम्ही माझ्या चित्रपटाची मजाच कमी करताय, असं म्हणत तो वेळोवेळी या दोघांमध्ये तिसरा होऊ पाहात होता. हा झाला मजेचा विषय. पण, अयाननं मित्र म्हणून कायमच आलिया आणि रणबीरची साथ देत त्यांचं हे नातं मोठं होताना पाहिलं. त्यांना लग्नबंधनात अडकताना पाहून त्याला प्रचंड आनंदही झाला होता. इतका प्रेमळ शत्रू असताना कोण त्याचा राग का करेल?