नाव बदलल्यामुळं मुस्लिम कुटुंबातील `या` सौंदर्यवती ठरल्या सुपरहिट
जाणून घेऊया हा अदलाबदलीचा निर्णय घेणाऱ्या अभिनेत्रींबद्दल...
मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये अशा काही अभिनेत्री नावारुपास आल्या, ज्यांच्या अभिनयानं सातत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. फार कमी वयातच प्रसिद्ध होण्याची किमया करण्यापासून काही अभिनेत्रींनी आपली खरी ओळखही लपवण्याचा निर्णय घेतला. चला तर, मग जाणून घेऊया हा अदलाबदलीचा निर्णय घेणाऱ्या अभिनेत्रींबद्दल...
Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट हिनं 2012 मध्ये 'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटापासून कारकिर्दीची सुरुवात केली. सध्याच्या घडीला आलिया आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कपूर कुटुंबाची सून असणारी आलिया मुळात एका मुस्लिम कुटुंबातील मुलगी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिचे आजोबा, म्हणजेच महेश भट्ट यांच्या वडिलांचं नाव शिरीन मोहम्मद अली असं होतं.
Reena Roy: 70-80 चं दशक गाजवणारी अभिनेत्री रिना रॉय हीसुद्धा मुस्लिम कुटुंबातूनच पुढे आली आहे. तिचं खरं नाव, सायरा अली असं आहे. 1972 मध्ये तिनं चित्रपटांमध्ये पदार्पण केलं त्याचवेळी तिनं नाव बदलत रिना रॉय ही नवी ओळख जगासमोर आणली.
Tabu: 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारी तब्बूही मुस्लिम आहे. तिचं खरं नाव, तब्बसुम फातिमा हाशमी असं आहे.
Manyata Dutt: लोकप्रिय अभिनेता संजय दत्त याची तिसरी पत्नी, मान्यता दत्त हिसुद्धा मुस्लिम आहे. दिलनवाज शेख असं तिचं खरं नाव. पण, चित्रपटांमध्ये नावारुपास येताना तिनं ओळख बदलत मान्यता या नावाला प्राधान्य दिलं.
Madhubala: आरस्पानी सौंदर्याची खाण, अशी ओळख असणाऱ्या मधुबाला यांचाही या यादीत समावेश होते. त्यांचं खरं नाव, मुमताज बेगम असं होतं.