मुंबई :  सेलिब्रिटी वर्तुळात यंदाच्या वर्षाची सुरुवातही लगीनघाईच्याच उत्साही वातावरणात झाली आहे. याचा प्रत्ययही नुकताच आला. तो म्हणजे कपूर कुटुंबतील थाटामाटात पार पडलेल्या एका विवाहसोहळ्यातून. रणबीर कपूरचा आतेभाऊ, म्हणजेच अरमान जैन याने नुकतीच अनिसा मल्होत्रा हिच्यासह लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचा कुटुंबातील जवळपास सर्वांचीच आणि इतरही सेलिब्रिटी मंडळींची उपस्थिती होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विवाहसोहळ्याला येणं टाळलं. पण, त्यांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच पत्नी नीतू आणि मुलगा रणबीरने मात्र अरमानच्या मुंबईतील रिसेप्शनला हजेरी लावली होती. अनेक बी- टाऊन सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 


सेलिब्रिटींच्या या उपस्थितीमध्ये लक्ष वेधून गेली ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीरची एंट्री. रिसेप्शनसाठी म्हणून आलिया आणि रणबीर या ठिकाणी पोहोचले, तेच मुळात एका खास व्यक्तीसोबत. सोशल मीडियावर या क्षणांचे फोटोही व्हायरल झाले. 




वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप


रणबीर- आलियाने या सोहळ्यासाठी प्रवेश केला त्यावेळी त्यांना साथ होती ती म्हणजे खुद्द नीतू कपूर यांची. रणबीरच्या आईसोबत आलियाचं येणं आणि कौटुंबीक कार्यक्रमांना तिची वाढती उपस्थिती असणं पाहता 'मामला सेट है...' अशाच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काहींनी तर, आता आलिया आणि रणबीरने लग्नाचं मनावर घ्यावं असंच थेट हक्काने सांगितलं आहे. चाहत्यांच्या विनंतीला, हट्टाला आता ही सेलिब्रिटी जोडी किती मनावर घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



आलिया आणि नीतू कपूर यांनी कायमच त्यांच्यामध्ये असणारं सुरेख नातं, सर्वांसमोर ठेवलं आहे. त्यातच आता कपूर कुटुंबीयांसोबतचा तिचा वावर पाहता, येत्या काळात आलिया आणि रणबीरच्या लग्नाची अधिकृ माहिती समोर आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.