मुंबई: आपल्या सभोवती असणारं वातावरण हेच आपल्या वाढीसाठी पूरक असतं, असं अनेकांचं म्हणणं आहे. रोजच्या आयुष्या घडणाऱ्या घडामोडी आणि त्यांचा आपल्यावर होणारा थेट परिणाम हे गणितच तसं आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक महत्त्वं असतं ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याला. शारीरिक स्वास्थ्यासोबतच मनही आनंदात असणं तितकच गरजेचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनावर एखाद्या गोष्टीचं दडपण असेल किंवा मग नैराश्याच्या वाटेवरच मवन जास्त घुटमळत असेल तर मात्र ही सारी परिस्थिती अतिशय कठीण होऊन जाते. 


अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीन हिलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 


एका वळणावर शाहीन आत्महत्येपर्यंत पोहोचली होती. अशा या वातावरणात तिला गरज होती ती म्हणजे आपल्या माणसांच्या आधाराची. 


शाहीनला ज्यावेळी खऱ्या अर्थाने आपली गरज होती तेव्हा एक बहीण म्हणून तिला आधार देण्यात अपयशी ठरल्याची भावना आलियाच्या मनात घर करुन गेल्यामुळे बी- टाऊनची ही स्टुडंट सध्या काहीशी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 



आलियाने सोशल मीडियावरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिने शाहीनप्रती असणाऱ्या आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 


शाहीनने तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकात नैराश्यग्रस्त परिस्थितीवर भाष्य केलं आहे. जवळपास 25 वर्षे एकत्र राहूनही आपण बहीणीच्या एकटेपणाला समजू शकलो नसल्याबद्दल आलियाने खंत व्यक्त केली आहे.