Alia Bhatt-Ranbir Kapoor: अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट, सध्या तिच्या आयुष्यातील सर्वास सुरेख काळ अनुभवत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिल्यानंतर आलियानं स्वत:कडेही लक्ष देण्यास सुरुवात केली. घर, संसार आणि आता लेकिची जबाबदारी ती लिलया पेलताना दिसत आहे. किमान राहा मोठी होईपर्यंततरी तिला माध्यमं, सोशल मीडिया या साऱ्यापासून दूर ठेवण्याचाच ती प्रयत्नांत आहे. संपूर्ण कपूर कुटुंबानं तिच्या या निर्णयात साथ दिली आहे. आतापर्यंत आलियानं कधीच राहाचा संपूर्ण चेहरा सर्वांसमोर आणलेला नाही. त्यामुळं कुटुंबीय वगळता इतर कुणालाही रणबीर आणि आलियाची लेक दिसते कशी याची कल्पना नव्हती (Alia bhatt daughter). 


काय फायदा, फोटो व्हायरल झालेच की.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटी अपेक्षित होतं तेच झालं. लपवून किती लपवणार... हेच आता चाहते आणि नेटकरी (Bollywood) बॉलिवूडच्या स्टार जोडीला म्हणताना दिसत आहेत. नुकतंच रणबीर आणि आलिया त्यांच्या लाडक्या लेकिला घेऊन पहिल्यांदाच फिरायला निघाले होते. यावेळी आलियाची बहीण, शाहीनसुद्धा त्यांच्यासोबत दिसली. मग...., मग काय? सेलिब्रिटींची एक झलक टीपण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या paparazzi मंडळींनी लगेचच या गोड कुटुंबाचे फोटो टीपण्यास सुरुवात केली. (Bollywood Actress alia bhatt ranbir kapoor went for a walk with daughter raha kapoor gets clicked see photos)


हेसुद्धा पाहा : Actress Pregnant Before Marriage : लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होत्या 'या' 5 लोकप्रिय अभिनेत्री!


अनेकांनी तर, त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअरही केले. या फोटोंमध्ये आलिया, रणबीर (Ranbir Kapoor) आणि शाहीननं काळ्या रंगाचे कॅज्युअल आऊटफिट घातल्याचं दिसत आहे. आलियानं यावेळी मोठ्या प्रेमानं लेकिला उचलून घेतलं होतं. तर, शाहीन त्यांच्या पुढे चालताना दिसली. दुसऱ्या एका फोटोमध्ये राहाला रणबीर सांभाळताना दिसला. 




राहाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक (Raha Kapoor Photos)


सोशल मीडियावर कपूर कुटुंबातील या तान्हुल्या परीचे फोटो पोस्ट करताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे आलिया आणि रणबीर, या दोघांचे किंबहुना शाहीनचाही चेहरा फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. पण, राहाच्या चेहऱ्यावर इमोजी लावण्यात आला आहे. त्यामुळं अद्यापही तिचा संपूर्ण चेहरा जगासमोर आलेला नाही. हो, पण फोटोमध्ये आलियानं उचलेल्या राहाला पाहून अरेच्छा, ही चिमुकली इतकी मोठी झाली अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. तुम्ही राहाचे फोटो पाहून काय म्हणाल?