मुंबई : रणबीर कपूरसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट हिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीत अंगरक्षकावर रागराग करणारी आलिया यावेळी छायाचित्रकारांची शाळा घेताना दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाडिया रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आलियाने उपस्थिती लावली होती. यावेळी तिचे फोटो टीपण्यासाठी आणि तिच्याशी संवाद साधण्यासाठी छायाचित्रकार आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी अखेर आलियानेच त्या छायाचित्रकारांची शाळा घेतली. 


वाढणारा गोंधळ आणि रुग्णालयात गरजेची असणारी शांतता हे मुद्दे लक्षात घेत अखेर आलिया, 'मी इथेच आहे. मी कुठेच जात नाही आहे. तुम्ही कृपया शांतता राखा. हे रुग्णालय आहे' असं म्हणाली. 


रुग्णालयात शांतता राखणं गरजेचं आहे, असं आलिया म्हणाली. यावेळी एक कलाकार म्हणून विविध ठिकाणी हजेरी लावण्यासाठी जाणाऱ्या कलाकारांनी त्या ठिकाणाचं गांभीर्य लक्षात घेत त्या अनुषंगाने वागण्यालाच सेलिब्रिटींचंही प्राधान्य असतं हेच स्पष्ट झालं. 



विविध चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या आलियाने तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत या कार्यक्रमाला हजेली लावली होती. सध्या आलिया 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून ती अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे.