Bollywood Actress Transformation: मला ना, अमुक अभिनेत्री इतकं सुंदर व्हायचंय...  तमुक अभिनेत्रीसारखं दिसायचंय असं अनेकजणी म्हणताना दिसतात. या अभिनेत्री कोण, तर आलिया, सोनम, प्रियांका किंवा इतर सर्व सौंदर्यवती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हालाही कधी वाटलंय का, आपण आलियासारखं दिसावं? जर असं वाटलं असेल तर आधी आलियाचे किंवा इतर बॉलिवूड अभिनेत्रींचे जुने फोटो पाहा आणि मग तुम्हाला त्यांच्यासारखं आपणंही दिसावं असं वाटतंय का, ते सांगा. 


ज्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकवर तुम्ही इतकं प्रेम करता त्या लूकसाठी या अभिनेत्रींनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आलियाचंच उदाहरण घ्या. काही वर्षांपूर्वीची आलिय़ा तुम्ही पाहिली तर म्हणाल, बापरे किती हा फरक... 



जागतिक स्तरावर आपल्या अभिनयानं सर्वांना गादर करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं शाहरुखच्या चित्रपटातून स्क्रीन शेअर करत कारकिर्दीची सुरुवात केली. पण, तिचा तेव्हाचा लूक आणि आताचा लूक यामध्ये कमाल फरक आहे. 



सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करण्याला प्राधान्य देणाऱ्यांमध्ये शिल्पा शेट्टी हिचं नाव येतं. शिल्पानं तिच्या नाकावर शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं गेलं. ज्यामुळं तिच्या सौंदर्यात भर पडली. 



हॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या प्रियांका चोप्रा हिच्या लूकमध्येही तुम्हाला अशीच तफावत जाणवेल. सूत्रांच्या माहितीनुसार सुंदर दिसण्यासाठी तिनंही सर्जरी केली होती. 



अभिनेत्री सोनम कपूर हिचा जुना फोटो पाहून तर, तुम्हाला विश्वासच बसणार नाही. म्हणजे काही वर्षांपूर्वी सोनम समोरून आली असती तरीही तुम्ही तिला न ओळखताच पुढे निघून गेला असतात, ती इतकी वेगळी दिसायची.