काय तर म्हणे फॅशन... एकसारखा ड्रेस खाली खेचणाऱ्या अनन्याचं नेमकं काय सुरु होतं?
अनेकांनीच तिची खिल्ली उडवलीये...
नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday)आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'गहराइयां' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ज्यानंतर आता या चित्रपटाची टीम प्रमोशनच्या कामाला लागली आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या, दीपिका आणि सिद्धांत सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. यावेळी या सेलिब्रिटींचे स्टाइल स्टेटमेंट पाहण्याजोगे आहेत.
एकिकडे दीपिका विविझ डिझायनर आऊटफिटनं सर्वांनाच घायाळ करतेय, तर दुसरीकडे अनन्यासुद्धा तिच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.
पण, अनन्या तिच्या आऊटफिट सिलेक्शनमध्ये काहीशा चुका करताना दिसतेय. एकिकडे मुंबईत थंडी पडलेली असतानाच अनन्यानं स्ट्रॅपलेस टॉप घालणं असो, किंवा मग दुसरीकडे नुकताच तिनं घातलेला एक मिनी ड्रेस असो.
थंडी लागली, म्हणून पुढच्याच कार्यक्रमात अनन्यानं थेड पूर्ण बाह्यांचा एक ड्रेस घातला. पण, त्यानं तिला वेगळ्याच अडचणीत टाकलं.
हा एक मिनी ड्रेस होता. जो घातल्यामुळं चालताना वारंवार वर जात होता. ड्रेस वर जातोय हे कळल्यावर अनन्या तो वारंवार खाली खेचत राहिली आणि कॅमेरामध्ये हे कैद झालं.
अनन्याला हे असं करताना पाहून, झेपत नाही तर फॅशन कराच का ? असाच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
अनेकांनी तिची खिल्लीच उडवली. आधी हिला थंडी लागली आणि आता ड्रेसच सावरेना... असं म्हणत तिला अनेकांनीच धारेवर धरलं.