मुंबई : मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचं बॉलिवूडशी असणारं नातं हा काही नवा विषय नाही. किंबहुना आजवर अनेक कलाकार आणि विशेष म्हणजे अनेक अभिनेत्रींचं नाव हे दाऊदशी जोडलं गेलं आहे. असं म्हणातात की काही अभिनेत्री दाऊदच्या प्रेमात अशा काही बुडाल्या होत्या, की त्यांनी करिअरपासूनही दुरावा पत्करला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानं अभिनेत्री मंदाकिनी हिला रातोरात प्रसिद्धीझोतात आणलं. ९० च्या दशकात ही अभिनेत्री चर्चेचा विषयही ठरली. पण, ती चित्रपटांमुळे नाही तर तिच्या प्रेमप्रकरणामुळं. मंदाकिनीचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं जाऊ लागलं. पण, ती स्वत: मात्र याविषयी फार काही बोलली नाही. 


चित्रपट पाहण्यासाठी हे दोघंही एकत्र जाऊ लागले. शारजामधील एका सामन्यादरम्यानही मंदाकिनी आणि दाऊदचा फोटो बराच चर्चेत आला. त्यावेळी मंदाकिनी दाऊदसोबतच दुबईला गेल्याचं समोर आलं. पण, त्यानंतर मात्र चित्रपट विश्वातील तिच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. खुद्द दाऊदनं मंदाकिनीला चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्मात्यांना धमकावल्याचंही म्हटलं जातं. पण, याचा तिच्या कारकिर्दीला मात्र काहीच फायदा झाला नाही. 


आपल्याहून कमी वयाच्या मुली दाऊदला आवडतात असं म्हणतात. पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुबसोबतची दाऊदचं अफेअर होतं. मंदाकिनीनंतर अनिता दाऊदच्या आयुष्यात आली. दाऊद आणि अनिताचं अफेअर एका धक्कादायक घटनेनंतर जगासमोर आलं. सिनेनिर्माता जावेद सिद्दीकीची हत्या झाली, यामागं कारण होतं अनिताला त्याच्या चित्रपटात घेण्यास दिलेला नकार. 


बी- टाऊन आणि दाऊदमध्ये जुनं नातं. चित्रपटांमध्ये दाऊदचेही पैसे लागत होते. त्याच्या घरी असणाऱ्या अनेक पार्ट्यांना कलाकारांचीही उपस्थिती असायची असं म्हटलं जातं. सध्याही दाऊच पाकिस्तानाच असण्याच्या चर्चांसमवेत त्याचं आणखी एक प्रेमप्रकरण आणि पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातसोबत असणारं नातं अनेकांच्या भुवया उंचावत आहे.