मुंबई :  काही महिन्यांपूर्वीच एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्नगाठ बांधत वैवाहिक जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करताना दिसली. एका व्यावसायिकाशी विवाहबंधनात अडकत या अभिनेत्रीनं हा प्रवास जगण्यास सुरुवात केली. ही अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी जैन याची जोडीदार म्हणून निवड करत करिअरमध्ये स्थिरस्थावर झालेली अंकिता जैन कुटुंबाची सून झाली. लग्नाला काही महिने उलटत नाहीत तोच आता म्हणे अंकितानं गोड बातमी दिली आहे.


ती गरोदर असल्याचं म्हटलं जात असल्यामुळं सध्या अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कारण अवघ्या तीनएक महिन्यांतच ही गोड बातमी अनेकांनाच अपेक्षित नव्हती.


एका कार्यक्रमादरम्यान अंकिता सर्वांसमोर आली आणि तिनं आपण गरोदर असल्याचं सांगितलं. विकीलाही याची माहिती नाही मित्रांनो... माझं अभिनंदन करा कारण मी गरोदर आहे. असं म्हणत तिनं सर्वांनाच धक्का दिला.


बरं तिथं कंगना राणौतही आली होती. अंकिताचा हा एप्रिल फूल प्रँक तिलाही खराच वाटला, पण पुढे हे खोटं सिक्रेट लवकरच खरं होवो... अशी इच्छाही तिनं व्यक्त केली.


प्रँकच्या निमित्तानं अंकितानं पतीलाही धक्काच दिला. खरं कारण नसलं तरीही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्यावेळी पाहण्याजोगे होते.



14 डिसेंबर 2021 ला अंकिता आणि विकीचं लग्न झालं. अतिशय दिमाखदार सोहळ्यात या दोघांनी साता जन्माची साथ निभावण्याची वचनं दिली. या सोहळ्यासाठी कला जगतातून अंकिताचे अनेक मित्रमंडळीसुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं.