मुंबई : 'मैने प्यार किया' या बॉलिवूड सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर मैने प्यार किया हा सिनेमा 1989 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. ही एक लव्हस्टोरी आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि भाग्यश्री या जोडीने या सिनेमात धुमाकूळ घातला होता. या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीही दिली होती. हा सिनेमा खूप हिट झाला. आणि भाग्यश्री पहिल्याच सिनेमातून खूप हिट झाली. या सिनेमानंतर अभिनेत्रीने लग्न केलं आणि सिनेसृष्टीला अलविदा केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अभिनेत्री भाग्यश्रीने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. आणि जुन्या दिवसांना आठवत सांगितलं की, सलमान या सिनेमावेळी तिच्यासोबत खूप फ्लर्ट करायचा. अभिनेत्रीने सांगितलं की, ते भाग्यश्रीजवळ यायचा आणि तिच्या कानात गाणं गुणगुणायचा. बिन सजना के माने ना. अभिनेत्रीला वाटू लागलं होतं की, सलमान तिच्यासोबत फ्लर्ट करु लागला आहे. त्यानंतर सलमान तिला एकट्यात घेवून जायचा आणि तेच गाणं पुन्हा ऐकवायचा.
 
अभिनेत्री पुढे म्हणाली की, तिला सलमानला सांगायचं होतं की, लोक काय विचार करतील? आपली प्रतिमा खराब होईल अशी भीती अभिनेत्रीला वाटू लागली. तेव्हा सलमान म्हणाला, मला माहीत आहे, तेव्हा अभिनेत्रीने विचारलं, तुला काय माहिती आहे? नंतर चर्चेत सलमानने सांगितलं की त्याला तिच्या आणि तिचा बॉयफ्रेंड हिमालय यांच्यातील नात्याबद्दल माहिती आहे. सलमान आणि हिमालयाचे कॉमन फ्रेंड्स होते. ज्यांच्याद्वारे सलमानला अभिनेत्रीच्या नात्याची माहिती मिळाली. अशा परिस्थितीत सलमान तिची खिल्ली उडवायचा.



आम्ही तुम्हाला सांगतो की, मैने प्यार किया हा सिनेमा सलमान खानचा मुख्य भूमिकेतला पहिलाच सिनेमा होता. तर दुसरीकडे भाग्यश्रीचा देखील हा पहिलाच सिनेमा होता. सुरज बडजात्याचा देखील हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमातून प्रेम हे कॅरेक्टर १९९० च्या दशकात सलमानला जोडलं होतं. नंतर तो राजश्रीच्या इतर चित्रपट हम आपके है कौन, हम साथ साथ है आणि प्रेम रतन धन पायो या सिनेमात दिसला.