मुंबई : #DeepikaRanveerWedding हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्याच्या घडीला हे दोघंही त्यांच्या कुटुंबीयांसमवेत उत्तर इटलीतील लेक कोमो येथे पोहोचले असून, आता त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाआधीच्या विधींना आणि समारंभांना Villa del Balbianello येथे मोठ्या दणक्यात सुरुवात झाली असून, पाहुणे मंडळींकडून त्यांविषयीची महिती समोर येत आहे.


रणवीरची स्टायलिस्ट निताशा गौरव हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. अर्थान तिने सदर ठिकणचा एकही फोटो पोस्ट केला नाही. पण, ट्विट लिहित ज्या शब्दांमध्ये तिने त्या क्षणाचं वर्णन केलं आहे, ते पाहता वाचणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर एक चित्रच उभं राहात आहे. 


'फोट पोस्ट करत नसले तरीही त्या क्षणामध्ये फक्त आणि फक्त प्रेमाचाच बहर पाहायला मिळत होता...', अशा आशयाचं ट्विट करत रणवीर-दीपिकाला एकत्र पाहणं म्हणजे नेमकं काय असतं याचाच आनंद तिने यातून व्यक्त केला होता. 


त्यांना पाहून आपल्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असले तरीही, हे अश्रू त्यांच्यापासून कायमच दूर रहावेत, अशा सुरेख शब्दांमध्ये तिने आपला आनंद व्यक्त केला. 


सोबतच #DeepVeerKiShaadi #ranveerkishaadi #foreverlove असे हॅशटॅगही लावले. 



रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती असणार हे फार आधीच ठरलं होतं. आता त्यातीलच काही सेलिब्रिटींची नावं, उघड होत आहेत. 


गायिका हर्षदीप कौर हिची इन्स्टा पोस्ट आणि त्यासोबतचं कॅप्शन पाहता तीसुद्दा लेक कोमोच्याच दिशेने रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे. 


'एका खास जागी... त्याहूनही खास कार्यक्रमासाठी मी निघाले आहे...', असं कॅप्शन देत हर्षदीपने हा फोटो पोस्ट केला. टीमसोबतही तिचा एक फोटो पाहायला मिळाला. त्यामुळे ते खास ठिकाण आणि तो खास कार्यक्रम म्हणजे लेक कोमो येथे पार पडणारा दीपिका- रणवीरचा विवाहसोहळाच आहे, याच निष्कर्षावर अनेकजण पोहोचले आहेत. 


हर्षदीप आणि तिची टीम १३ नोव्हेंबरला दीपिका-रणवीरच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 




दरम्यान, जसजशी लग्नाची तारीख जवळ येत आहे, तसतसं लेक कोमो येथून येणारे फोटो आणि चर्चा आणखी जोर धरत असल्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस हे वातावरण काय़म असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.