मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचं स्टार कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या नात्यात म्हणे तक्रारींचं सत्र सुरु झालं होतं. खुद्द दीपिकानंच तिचा पती, रणवीर सिंग याची तक्रार थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे केली होती. (Deepika Padukone Ranveer Singh )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेकफास्ट बनवून देईन असं रणवीर म्हणाला होता, पण तसं काहीच होताना दिसत नाही अशी तक्रार दीपिकानं केबीसीच्या मंचावर केली होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा या जोडीमधील क्टूट चॅट समोर आलं आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातूनही एका अफलातून मार्गानं या जोडीनं एकमेकांशी संवाद साधला आहे. 


नुकतंच इन्स्टाग्रामवर रणवीरनं Ask Me Anything सेशन ठेवलं होतं. जिथं अनेक चाहत्यांसह रणवीरला त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनंही एक प्रश्न केला. ज्यावर रणवीरनं त्याच्याच अंदाजात उत्तर देत या नात्याची गोड बाजू सर्वांसमोर ठेवली. 


आस्क मी एनीथिंग सेशनदरम्यान, दीपिकानं रणवीरला विचारलं घरी कधी येणार? पत्नीच्या या प्रश्नाचं उत्तर देत रणवीरनं लिहिलं, 'जेवण गरम करुन ठेव बेबी, हा बघ मी आथा पोहोचतच आहे'. या उत्तरासोबत रणवीरनं एक किसिंग इमोजी जोडत आपण या अटीवरच घरी येऊ असंच जणू पत्नीला सांगितलं. आता पतीची ही अट पाहता दीपिकानं ती पूर्ण केली का, हाच प्रश्न चाहत्यांना पडला. 


 


दीपिका आणि रणवीर शक्य त्या सर्व क्षणांना एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करताना दिसतात. हा चॅटही त्याचंच एक उदाहरण आहे, असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळात रणवीर आणि दीपिका विविध चित्रपटांच्य़ा माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर, भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्यावहिल्या विश्वचषक विजयावर बेतलेल्या '`83' या चित्रपटातून ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.