पाहा रणवीरला दुसरं कोणी I love you म्हणताच दीपिकाची प्रतिक्रिया
व्हिडिओ वेधतोय सर्वांचं लक्ष
मुंबई : आगामी चित्रपट, जाहिराती अशा एकंदर कामाच्या व्यापात व्यग्र असणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग या सेलिब्रिटी जोडीने त्यांच्या खासगी आयुष्याला कायमच केंद्रस्थानी ठेवलं आहे. लग्नाला वर्षपूर्ती होण्याच्या निमित्ताने याचा प्रत्यय आला.
सहजीवनाचं हे एक वर्ष साजरा करण्यच्या निमित्ताने रणवीर आणि दीपिकाने तिरुपती सुवर्ण मंदिर अशा दोन स्थळांना भेट दिली. या दोन्ही ठिकाणी दीप-वीरच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तिरुपती देवस्थानचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे.
दीपिकाला पाहताच चाहत्यांच्या गर्दीतून दीपिकाला उद्देशून ‘I love you’ असा आवाज आला. चाहत्यांचं आपल्यावर असणारं प्रेम पाहून दीपिकानेही या प्रेमाचा हसत स्वीकार केला. त्यानंतर त्याच चाहत्याकडून रणवीरला उद्देशूनही, ‘I love you’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली गेली. तेव्हाच दीपिकाने आपल्याला सर्वप्रथम ‘I love you’ म्हणणाऱ्या चाहत्याला / चाहतीला उद्देशून पण, तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे.....! 'But, you love me more!' असं म्हणत सुरेख हास्य दिलं. रणवीरवर प्रेम व्यक्त करणाऱ्या चाहत्यांमध्ये आणि त्या क्षणी उपस्थित असणाऱ्यांमध्ये त्या क्षणी एकच हशा पिकला. दीप- वीरचे हे आनंददायी क्षण सध्या चाहत्यांचीही मनं जिंकत आहेत.
एकिकडे व्हायरल व्हिडिओच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री आता रुपेरी पडद्यासाठीही सज्ज होत आहे. येत्या काळात ते कबीर खान दिग्दर्शित '`८३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.