मुंबई : कलाविश्वात कलाकार मंडळी कायमच त्यांच्या लूकबाबत प्रयोगशील असतात. कोणी त्यांच्या वेशभूषेविषयी तर, कोणी एकंदरच आगामी भूमिकांविषयी. कित्येकदा तर या सेलिब्रिटींना या एका लूकसाठी काही गोष्टींची तडजोडही करावी लागते. अशीच एक गोष्ट रणवीर सिंगला करावी लागली होती. तेसुद्धा त्याच्या पत्नीसाठी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासाठी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर आपली मतं मांडणाऱ्या दीपिकासमोर एयक प्रश्न ठेवण्यात आला. सतत रंगीबेरंगी, अतरंगी कपडो घालणाऱ्या रणवीरला पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स असा वेश दिला तर? या प्रश्नाचं उत्तर देत रणवीरने पदुकोण कुटुंबाचा ड्रेसकोड, त्यांची कप़डे घालण्याची पद्धत आत्मसाद केली पाहिजे किंबहुना ती त्याने केलीही, असं दीपिका म्हणाली. 


पांढरा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पाहिली तर, माझ्या पालकांना भेटण्यासाठी येतो तेव्हा त्याचा असाच लूक असतो हा खुलासा दीपिकाने केला. कुटुंबाचा एखादा खास कार्यक्रम असेल तर,  त्याला ठरलेल्या वेशभूषेप्रमाणेच यावं लागेल. तो लूक म्हणजे काळ्या रंगाची पँट, निळी जीन्स, पांढऱ्या रंगाचं एकही चुणी नसलेलं शर्ट किंवा गोल गळ्याचं टी- शर्ट. 



आता फॅशनविषयी असणारी रणवीरची समज आणि त्याच्यासाठी या गोष्टीचं असणारं महत्त्व पाहता, औपचारिक कार्यक्रमांना जात असल्याप्रमाणे चक्क पांढऱ्या रंगाचा शर्ट किंवा टी शर्ट म्हणजे त्याच्यासाठी काहीसं वेगळंच.... पण, दीपिकासाठी काहीपण असं म्हणत रणवीर हेसुद्धा मोठ्या शिताफीने निभावून नेत असेल असं म्हणायला हरकत नाही.