मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बहुतांश व्यवहार ठप्प झाले. सतत चित्रपट किंवा इतर कोणत्या कारणाने, चित्रीकरणाच्या निमित्ताने घराबाहेर असणारी कलाकार मंडळीसुद्धा यामुळे आपआपल्या घरातच स्थिरावली. याच कलाकारंपैकी एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होम क्वारंटाईनच्या या काळात दीपिका सर्वतोपरी तिच्या घराप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. कपड्यांचं कपाट नीट लावणं असो किंवा मग पती, रणवीर सिंग याच्यासाठी चांगलेचुंगले पदार्थ बनवणं असो. दीपिका तिचे अनेक कलागुण सध्या आजमावून पाहत आहे. 


तिचा पती म्हणजेच रणवीर या दरम्यान, काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत जणू काही दीपिकाला प्रोत्साहनच देत आहे. पण, या साऱ्यात दीपिकाचा तिची एक आवड महागात पडल्याची माहिती आता समोर आली आहे. बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला घर स्वच्छ ठेवण्याची कमालीची आवड. पण, हेच काम करत असताना काही दिवसांपूर्वी दीपिकाने स्वत:लाच दुखापत करुन घेतली. एका व्हर्च्युअल मुलाखतीमध्ये तिने ही बाब सर्वांसमोर आणली. 


'मी साफसफाई करतेवेळी माझ्या पाठीलाच दुखापत करुन घेतली होती त्यानंतर मला प्रचंड कंटाळाही आला. त्यावेळी मी कोणतंही काम करणार नाही याबाबत रणवीर कमालीची काळजी घेत होता', असं ती म्हणाली. 


व्यायाम करण्यासाठी म्हणून रणवीर दीपिकाला आराम करण्याची ताकिद देऊन गेला. अवघ्या २० मिनिटांतच तो परत आला तेव्हा दीपिका आराम करण्याऐवजी पुन्हा काम करत असल्याचं त्याने पाहिलं आणि बस्स, तेव्हा मातर त्याने तिला पुन्हा एकाच जागी बसून शांतपणे आराम करण्याचा सल्ला दिला. तुझ्या पाठीला दुखापत झाली आहे, आता एका जागी बसशील का?, असं म्हणत त्याने दीपिकाला हलकीशी दमदाटी केली असंत म्हणावं लागेल. 



सध्याच्या वेळी दीपिका आणि रणवीर हे अतिश सुरेख क्षणांचा अनुभव घेत आहेत. मुख्य म्हणजे या नात्यात मिळालेले हे क्षण त्यांना एक व्यक्ती म्हणून आणि एक जोडीदार म्हणून अधिक समजूतदारही बनवत आहेत.