Disha Patani Video Viral: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) तिच्या टोन्ड बॉडीमुळे (Toned Body) ओळखले जाते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिशा पटनी अनेकदा तिच्या हॉट फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या फॅशन (Fashion) आणि फिटनेसमुळे (Fitness) सर्वत्र चर्चेत असते. आत्तापर्यंत तिने चित्रपटांमध्ये कोणतीही खास कामगिरी दाखवली नसली तरी सोशल मीडियावर तिच्या धमाकेदार फोटोंमुळे ती अनेकदा चाहत्यांच्या हृदयावर थिरकते. दिशा पटानी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या नात्यामुळेही खूप चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे. (bollywood actress disha patani spotted with mystery boy after breakup with Tiger shroff video viral nz)



कोण आहे ही व्यक्ती दिशासोबत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral)  होत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये (Bikini) काहीतरी खाताना दिसत आहे. दिशा मोकळ्या केसांमध्ये अप्रतिम दिसत आहे. पण तेवढ्यात कॅमेरात एक मिस्ट्री बॉय (Mystery Boy) दिसतो. सर्वप्रथम, तुम्ही देखील हा व्हायरल व्हिडिओ पाहावा ज्याला सोशल मीडियावर (Social Media) खूप व्ह्यूज मिळत आहेत.


हे ही वाचा - बॉलीवूडचा 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, एकूण धक्का बसेल 


कॅप्शनमध्ये BFF म्हणाले!


या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये (Caption) दिशा पटनी BFF सोबत चिलिंग करत असल्याचे लिहिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहते कमेंट (Comment) सेक्शनमध्ये टायगर श्रॉफबद्दल (Tiger Shroff) विचारताना दिसले. दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपचे कारण हा मिस्ट्री बॉय आहे का, असा प्रश्नही लोक विचारत होते. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती दिशाचा ट्रेनर अलेक्झांडर एलेक्स इलिक (Alexander Alex Ilic) आहे.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


व्हिडिओ व्हायरल 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांना (Social Media Video ) या व्यक्तीचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. मात्र, दिशा पटनीने टायगरसोबतच्या ब्रेकअपबाबत किंवा रिलेशनशिपबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती (Alex) देखील एक अभिनेता आणि मॉडेल आहे.