नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या वर्षी प्रदर्शित झालेला  'गोलमाल अगेन' हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय ठरला. त्याच चित्रपटातील 'आते जाते' हे गाणं लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरलं. या गाण्याची क्रेझ तरुणाईमध्ये दिसून येत आहे. फक्त तरुणाईच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिला देखील या गाण्याची भुरळ पडली आणि तिचा या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Melvin Louis या युट्युब चॅनेलने अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गौहर खान कोरियोग्राफर ल्विन लुइस सोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ १२ नोव्हेंबरला अपलोड करण्यात आला आहे. फक्त पाच दिवसात या व्हिडीओ ३७७,२३३ वेळा बघितला गेला आहे. त्याचबरोबर त्यावर अनेक कमेंट्स देखील मिळाल्या आहेत. यात गौहर खानचे डान्स मूव्‍सज मन जिंकून घेतील. 



रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' हा चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त परिणीति चोपड़ा, अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.