मुंबई : बॉलिवूडमध्ये क्यूट कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितेश देशमुख आणि त्याची पत्नी Genelia dsouza यांनी कायमच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत चाहत्यांशी असणारं नातं जपलं आहे. पण, या नात्यात असेही प्रसंग आले आहेत जेव्हा याच नात्याच्या सीमा ओलांडल्या गेल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अरबाज खान याच्या टॉक शोमध्ये याचीच एक झलक पाहायला मिळाली. जिथं कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये चाहत्यांनी genelia dsouza केलेल्या विचित्र कमेंट्स पाहून अभिनेत्रीलाही धक्काच बसत आहे. pinch या कार्यक्रमामध्ये genelia dsouza त्या व्हिडीओबाबत कमेंट करताना दिसत आहे, जिथं प्रिती झिंटानं रितेशला मिठी मारली होती आणि त्याला पाहून genelia dsouza नं विचित्र प्रतिक्रिया दिली होती. 


जेनेलियानं या व्हिडीओवरील कमेंट्स पाहिल्या. 'बेशर्म, चीप, अश्लील आंटी कायमचीच ओवरएक्टिंग. तुझ्या चेहऱ्यावर हे शोभून दिसत नाही. हेसुद्धा तेव्हा जेव्हा तुला दोन मुलं आहेत. मुलंही तुला पाहून हादरतील.'यावर उत्तर देत  रितेशची पत्नी म्हणाली, मला असं वाटतंय की तुमचा दिवस चांगला गेलेला नाही. मी आशा करते की तुम्ही ठीक असाल.... एकिकडे पत्नीनं हे उत्तर दिलेलं असतानाच दुसरीकडे रितेसनं सेलब्रिटींनी ट्रोलिंगबाबत धीट होणं गरजेचं आहे असा संदेश दिला. लोकं हरकत घेतात कारण, तुम्ही त्यांच्या समोर येता. मला नाही वाटत यात वाईट वाटण्यासारखं काही आहे.... असं तो म्हणाला.