Karisma Kapoor on Old Bollywood Days: सध्या सिनेसृष्टीत आलिया भट्ट, दीपिका पादुकोन,श्रद्धा कपूर, करिना कपूर अशा अनेक अभिनेत्रींची चर्चा होत असते. पण एक काळ असा होता जिथे करिश्मा कपूर, काजोल, राणी मुखर्जी यांची चर्चा असायची. आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सिनेमा बनतात. हिरो हिरोईन्सना खासगी व्हॅनिटी व्हॅन असतात. पण त्याकाळी सिनेमाच काय बड्या स्टार्सनाही इतक्या सुविधा मिळत नसतं. बॉलिवूडमध्ये प्रदीर्घ काळ घालवलेल्या करिश्मा कपूरने अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. करिश्मा कपूर आजही दिसायला तितकीच सुंदर असून तिची  गणना आज सर्वात ज्येष्ठ अभिनेत्रींमध्ये केली जाते. 90 च्या काळात करिश्मा-गोविंदा, करिश्मा-आमिर यांच्या जोडीने गाजवला. 


करिश्माला आठवला जुना काळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1991 मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  90 आणि 2000 च्या दशकात तिने एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. सध्या करिश्मा कपूर 'इंडियाज बेस्ट डान्सर' या डान्स रिॲलिटी शोची जज आहे. त्यातील एका एपिसोडमध्ये तिने बॉलीवूडचा जुना काळ, संघर्ष आणि त्रास आपल्या शब्दात मांडलाय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या 20 वर्षात किती बदल झालाय हे ती सांगतेय. करिश्मा आगामी एपिसोडमध्ये झीनत अमानच्या रेट्रो लूकमध्ये दिसणार आहे. या एपिसोडच्या प्रोमोमध्ये करिश्मा कपूर बॉलिवूडच्या जुन्या काळाविषयी बोलताना दिसतेय. 


असे होते बॉलीवूडचे जुने दिवस


‘दिल तो पागल है’ या पहिल्या चित्रपटाच्या वेळी डान्स शूट दरम्यान सेटवर पहिल्यांदा मॉनिटरचा वापर करण्यात आला होता. यशजी शूटिंगला मॉनिटर घेऊन आले तेव्हा मी, आदि आणि उदय पाहतच राहिलो. एक सीन शूट झाल्यावर आम्ही कसा अभिनय केलाय हे मॉनिटरवर बघायचो, असे करिश्माने सांगितले.


स्वतःची व्हॅन नसायची


जुबैदाच्या शूटिंगदरम्यान मला पहिल्यांदा सिंकबद्दल कळले. लाइव्ह साऊंडसाठी मी पहिल्यांदाच लॅपल मायक्रोफोन वापरला. त्या काळात अभिनेत्रींकडे स्वतःची व्हॅन नसायची. कपडे बदलण्यासाठी आम्ही झाडांच्या मागे जायचो. आम्ही झाडाच्या मागे जाऊन कपडे बदलायचो असे ती सांगते. गेल्या 40 ते 50 वर्षांत परिस्थिती खूप बदलल्याचे करिश्माने सांगितले.


दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत बनवली ओळख


करिश्मा कपूरने प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने जिगर, राजा बाबू, अंदाज, राजा हिंदुस्तानी आणि कुली नंबर या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. त्यावेळी बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये करिश्मा कपूरचे नाव घेतले जायचे.


मोठ्या ब्रेकनंतर ओटीटीतून पदार्पण 


2003-2012 मध्ये तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. यानंतर तिने डेंजरस इश्क या सिनेमातून पुनरागमन केले. यावर्षी करिश्माने ओटीटीमध्ये पदार्पण केले. मर्डर मुबारकमधील तिची भूमिका लोकांना खूप आवडली.