मुंबई : कलाकार मंडळी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकात इतके गुंतून जातात की अनेकदा काही महत्त्वाच्या गोष्टींकडेही त्यांचं दुर्लक्ष होतं. झगमगाटाच्या या दुनियेत ही कलाकार मंडळी शरीराने आणि मनानेही अनेकदा पूर्णपणे थकून जातात. जे कित्येकदा त्यांच्या चेहऱ्यापलीकडे झाकून जातं. पण, अभिनेत्री जान्हवी कपूर मात्र हे सारंकाही लपवून न ठेवण्याच्या मनस्थितीत सध्या दिसत आहे. किंबहुना कारकिर्दीतील या टप्प्यावर आता खऱ्या अर्थाने जान्हवीला तिची आई, श्रीदेवी यांच्या आधाराचीही गरज भासू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणून आपण नेमकं कोणत्या स्तरावर काम करतो, याचा खुलासा जान्हवीनं केला आहे. 


आपण एक प्रामाणिक कलाकार असल्याचं सांगत आपल्याला अनेकदा पूर्णपणे थकल्यासारखं वाटत नाही, असं जान्हवी म्हणाली. 


पण, जेव्हा असं काही वाटत नाही तेव्हा मी त्या प्रोजेक्टसाठी सर्वस्व दिलेलं नसतं, हा दृष्टीकोनही तिनं मांडला. सध्या जान्हवी ज्या परिस्थितीतून जात आहे त्याबाबतच तिनं हे वक्तव्य केलं. 


आपण अशा एका प्रोजेक्टवर काम केलं होतं, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा आला होता. याउलट आता काम करत असणारं प्रोजेक्ट म्हणजे जणू एक सुट्टीच असंच वाटत असल्याचं जान्हवी म्हणाली. 


'हेलन' या मल्याळम चित्रपटाच्या रिमेकसाठी काम करताना जान्हवीची ही अवस्था झाली होती, असा उलगडा तिनं केला. 


एक कलाकार म्हणून जान्हवी सध्या तिच्या परिनं प्रत्येक प्रोजेक्टमागे चांगली मेहनत घेताना दिसत आहे. 


विविध भूमिका साकारत ती आपल्याल अभिनय कौशल्याला आव्हानही देताना दिसते. याचीच पोचपावती तिला प्रेक्षकांच्या प्रेमाच्या रुपात मिळते.