मुंबई : 'धडक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. विविध जाहिरातींचं चित्रीकरण, फॅशन शो आणि इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये जान्हवीची उपस्थिती असते. अशा या कामाच्या व्यापातून ती इतरही अनेक गोष्टींना प्राधान्य देते. बी- टाऊनच्या 'मिस हवाहवाई'च्या याच लेकीने आता तिच्यासाठी एक नवी कार खरेदी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या नव्या कारमधून विविध ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 'फिल्मफेअर'च्या वृत्तानुसार जान्हवी गेल्या काही दिवसांपासून Mercedes Maybach ही तिची नवी कार सर्वांचं  लक्ष वेधत आहे. 



ही नवी कार जान्हवीसाठी अधिकच खास आहे, त्यामागचं कारणही तसंच. आपल्या आयुष्यात आईला म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या जान्हवीने या कारसोबतही त्यांच्या आठवणी जोडल्या आहेत. खुद्द श्रीदेवी ज्या कारचा जास्त वापर करायच्या त्या कारचा क्रमांक आणि जान्हवीच्या कारचा क्रमांक हा एकसारखाच आहे. ७६६६ अशा क्रमांकाची कार श्रीदेवीसुद्धा वापरत होत्या. त्यामुळे एका अर्थी आपल्या आईची साथही जाव्हवीला एका वेगळ्या माध्यमातून मिळत आहे, असं म्हणायला हरकत नाही.