मुंबई : एनसीबी, अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत आलिशान क्रूझवर धाड टाकत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला प्रथम ताब्यात घेत त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. आर्य़नसोबतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीही काही नावं समोर आली. ज्यानंतर संपूर्ण कलाविश्वालाच हादरा बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे शाहरुखच्या मुलावर ही कारवाई होत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर आणखी एका सेलिब्रिटीच्या नावाच्या चर्चांनी जोर धरला हे. ही सेलिब्रिटी म्हणजे अभिनेत्री जया बच्चन. (Bollywood actress jaya-bachchan-trolled-after-shah-rukh-khan-son-aryan-khan)


ट्विटरवर जया बच्चन ट्रेंडमध्येही आल्या आहेत. त्यांच्या एका जुन्या भाषणाचा संदर्भ देत नेटकरी आता जया बच्चन यांनाच प्रश्न करू लागला आहेत. जया जी..... अब बताइये, थाली मे छेद किसने किया? अशाच प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर करण्यात येत आहे. 




का उडवली जातेय खिल्ली? 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर एनसीबीनं मुंबईत ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. हाय प्रोफाईल पार्टींवर त्यांची करडी नजर पाहायला मिळाली. याच मुद्द्यावर बोलताना चित्रपटसृष्टी ड्रग्ज आणि नशेचा अड्डा असल्याचं मत खासदार रवी किशन यांनी मांडलं होतं. बॉलिवूडला नशामुक्त करण्याची गरज असल्याचा टोमणाही त्यांनी दिला होता. त्याचवेळी 'जिस थाली मे खाते हो, उसीमे छेद करते हो' अर्थात खाल्ल्ल्या मीठाला तरी जागा अशीच प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली होती. बच्चन यांच्या याच वक्तव्याला निशाणा करत आता खाल्ल्या मीठाला नेमकं कोण नाही जागलं, या आशयाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.