Juhi Chawla on Star Kids: गेल्या दोन एक वर्षात स्टार कीड्स आणि बॉलीवूड (Bollywood and Star Kids) हा विषय प्रेक्षकांना चांगलाच सवयीचा झाला आहे. या विषयाबद्दल आजकाल बॉलीवूड फारसं काहीच बोलत नसलं तरी आता मात्र बॉलीवूडमधल्या एका नामवंत अभिनेत्रीनं याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिनं याबद्दल सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री आहे नव्वदच्या काळात दिग्गज अभिनेत्री जूही चावला (Actress Juhi Chawla). शाहरूख खानची अतिशय जवळची मैत्रीण आणि यापुर्वी आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) शाहरूखच्या परिवाराला मदत करणारी अभिनेत्री जूही चावला सध्या स्टार कीड्सच्या प्रेमात पडली आहे. 


आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल


गेल्या काही वर्षांमध्ये तिनं अनेक अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे आणि तिनं अनेक स्टार कीड्सना लहानचं मोठं होताना पाहिलं आहे. याच स्टार कीड्स घेऊन जूही चावलानं एक मोठं वक्तव्य केलं आहे तिच्या मते हे स्टार कीड्स मनापासून मेहनत घेतात आणि आपल्या कामाबद्दल कायम प्रामाणिक असतात. 


मुलाखतीत जुहीने शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि चित्रपट निर्माता डेव्हिड धवनचा मुलगा वरुण धवन (Varun Dhawan) यांच्यासह इतर स्टार कीड्सबद्दल हा खुलासा केला आहे. 


जुही म्हणाली, “सुहाना आणि सर्वच ही मुलं माझ्यासमोर लहानाची मोठी झाली आहेत. फक्त सुहाना नाही तर अशा अनेकजण आहेत. स्वर्ग (Swarg) (1990) मध्ये जेव्हा मी डेव्हिडजीसोबत पहिल्यांदा शूटिंग केले तेव्हा त्यांचा मुलगा अभिनेता वरुण आणि दिग्दर्शक रोहित धवन (Rohit Dhawan) हे लहान होते. आता ते सुपरस्टार बनले आहेत त्यामुळे ते किती प्रतिभावान आहेत याची मला कल्पना आहे. 


आणखी वाचा - 'आमच्या घरात...' Shweta Tiwari नं सांगितला 'तो' थरारक अनुभव 


ती पुढे म्हणाली की “ते सर्व खरोखर कठोर परिश्रम करतात. मी एक स्टार किड आहे हे त्यांच्यापैकी कोणीही हलकेपणाने घेत नाही, त्यामुळे मी फक्त सेटवर येईन आणि सगळंच मला मिळेल असा विचार ते करत नाहीत. त्यापैकी बरेच जण खरोखर कठोर परिश्रम करतात. यामध्ये कोण माझा आवडता आहे हे मी सांगू शकत नाही पण ही मुलं फार मेहनती आहेत.” 


वरुण धवनने 2012 मध्ये करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून (Karan Johar's Student Of the Year) चित्रपटात पदार्पण केले आणि त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया Humty Sharma Ki Dulhaniya), ऑक्टोबर (October), आणि जुगजग जीयो (Jug Jug Jiyo) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानं बॉक्स ऑफिसवर यश आणि समीक्षकांची प्रशंसा दोन्ही मिळवले.


आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?


सुहाना झोया अख्तरच्या द आर्चीजमधून (Zoya Akhatar's The Archies) ती अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटातून बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Amitabh Bachchan's Grandson Agastya Nanda) यांच्या पडद्यावर पदार्पण करते आहे. 


जूही सध्या प्राइम व्हिडिओच्या थ्रिलर शो हुश हुश (Hush Hush) मधून ओटीटीत पदार्पण करते. तनुजा चंद्रा शोमध्ये सोहा अली खान (Soha Ali Khan), शहाना गोस्वामी, कृतिका कामरा आणि आयेशा झुल्का (Ayesha Zhulka) देखील आहेत. हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.