मुंबई : कोरोना coronavirus काळात कोणत्याही माध्यमातून प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं जाणं बंधनकारक असल्याचं शासनाकडूनच सांगण्यात आलं. पण, सर्वच ठिकाणी या नियमांचं पालन केलं जातंच असं नाही. मुळात ही बाब अतिशय धोक्याची आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एका प्रसंगाचा सामना कराव्या लागलेल्या अभिनेत्री जुही चावला हिनं केला. ज्यानंतर ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत तिनं संतापही व्यक्त केला. 


पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये जुही एका विमानतळावर असल्याचं लक्षात येत आहे. तिच्या आजुबाजूला अनेक प्रवासी काहीसे चिडलेले दिसत आहेत. विमानतळ व्यवस्थापनावर त्यांचा रोष असल्याचंही या व्हिडिओतून लक्षात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांनी फेसशिल्डचा वापर तर केला आहे. पण, इथं सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसत आहे. 


जुहीनं हा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबत लिहिलं, 'विमानतळ आणि शासकीय  अधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी इथं विमानतळावरील आरोग्य तपासणी केंद्रावर जास्तीचे कर्मचारी नियुक्त करावेत. प्रवाशांना इथं तासन् तास उभं राहावं लागत आहे. हे तर खरंच फार दयनीय आणि लज्जास्पद आहे'.



 


एकिकडे कोरोनापासून बचावासाठी अनेक नियम आखले जात असतानाच या नियमांचं पालन केलं जाणंही गरजेचं आहेत. त्यासाठीच काटेकोर पावलंही उचलली जावीत असाच सूर तिनं या ट्विटच्या माध्यमातून आळवला.