मुंबई : 'सिंघम' या चित्रपटातून आपल्या अभियाची छाप सोडणारी, अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री काजल अग्रवाल हिनं मागील वर्षी प्रियकर गौतम किचलू याच्याशी लग्नगाठ बांधली. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर काजल आणि गौतमनं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर वर्षभरातच आता या नात्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम आणि काजलचं नातं आता एका नव्या वळणावर आलं असून, याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेलं हे वळण म्हणजे, एका नव्या पाहुण्याची चाहूल. काजल आणि गौतमच्या जीवनात एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


व्यावसायित गौतम किचलू आणि काजल अग्रवाल यांनी अतिशय दिमाखदार सोहळ्यात लग्नगाठ बांधली. ज्यानंतर अनेकदा या जोडीनं सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या या जोडीच्या जीवनात आता एका खास व्यक्तीची आणि खास क्षणाचीच एंट्री होणार असल्याचा सुगावा लागताच चाहत्यांनीही या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. 


असं असलं तरीही काजल आणि गौतम ही गुडन्यूज त्यांच्या परिनं नेमकी कधी सर्वांसमोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काजलच्या आगामी सर्व चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. उर्वरित चित्रीकरण पूर्ण करुन ती काही काळ कामापासून दूर राहू इच्छिते. गरोदरपणामुळंच ती कोणतंही नवं काम हाती घेत नसल्याचं म्हटलं जात आहे.