मुंबई : Durga Puja 2019 नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आता कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटीसुद्धा या उत्सवात सहभागी होत आहेत. या सेलिब्रिटींपैकी सुरुवातील दुर्गापूजेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी गेलेली अभिनेत्री म्हणजे काजोल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगणची पत्नी, अभिनेत्री काजोल हिने नुकतीच आपली आई, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि बहीण तनिषा यांच्यासोबत एका मंडपात हजेरी लावली. यावेळी ती लाल आणि सोनेरी रंगसंगती असणाऱ्य़ा एका सुरेख ड्रेसमध्ये दिसत होती. तर, तनिषाने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती. 



जुहू येथील मंडपात हजेरी लावणाऱ्या काजोलने सोशल मीडियावर या खास क्षणांचे काही फोटोसुद्धा शेअर केले. ज्यामध्ये ती, तिची आई आणि बहीण अतिशय आनंदात दिसत होत्या. यावेळी मंडपातून बाहेर पडतेवेळी काजोल पुन्हा काहीशा खेळकर अंदाजात दिसली. 



आपल्या हातात असणारी पिवळ्या रंगाची एक बॅग दाखवत ही बहिणीने केल्याचं ती माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगताना दिसली. यावेळी काजोल आपल्या बहिणीने तयार केलेल्या या कलाकृतीविषयी सर्वांनाच सांगत होती. यावेळी तिची आणि तनिषाची काही फोटोंविषयीसुद्धा चर्चा झाल्याचं एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलं. तनिषाने काढेलेल्या काही फोटोंमधील फोटो आपल्याला हवे असल्याचं सांगत काजोलने ते तिच्याकडे मागितले. अभिनेत्री तनुजा आणि त्यांच्या या दोन मुलींचा हा अंदाज आणि दुर्गापूजेच्या निमित्ताने त्यांचं देवीच्या दर्शनास येणं अनेकांची मनं जिंकून गेलं.